race to buy citi bank assets hdfc axis kotak mahindra and indusind bank
Citi Bank: भारतातून तब्बल ११९ वर्षांनी निरोप घेणार ‘ही’ विदेशी बँक; HDFC, अॅक्सिसमध्ये खरेदीसाठी तीव्र स्पर्धा By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 12:03 PM1 / 10गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात विविध क्षेत्रात खासगीकरण तसेच अनेक कंपन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारी कंपनी असलेल्या Air India ची खासगीकरण प्रक्रिया सुरू आहे. 2 / 10यातच आता अमेरिकन बहुराष्ट्रीय बँक सिटी बँकेने भारतातील व्यवसाय गुंडाळण्यास सुरवात केली आहे. त्यांनी हा व्यवसाय विकण्याची तयारी सुरू आहे. एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि इंडसइंड बँकेने सिटी बँकेचे इंडिया ऑपरेशन्स खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे. 3 / 10डीबीएस बँकेने यापूर्वीही म्हटले होते की, ते सिटीबँकचा भारतातील व्यवसाय खरेदी करण्यास इच्छुक आहे. काही लोकांच्या मते, डीबीएस बँकेने बोली प्रक्रियेत भाग घेतला नाही. जेव्हा सिटीबँक आपले भारतीय कामकाज विकेल, तेव्हा खरेदीदारांकडून चांगली पसंती मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली होती. 4 / 10पण सिटीग्रुपने जादा व्हॅल्युएशनची मागणी केल्यामुळे अनेक खरेदीदारांनी माघार घेतली. सिटी बँकसाठीच्या बोलीची मुदत २२ ऑक्टोबर रोजी संपल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच क्रेडिट सुईसचा अहवाल आला.5 / 10या अहवालानुसार, सिटीबँकेचा किरकोळ व्यवसाय (क्रेडिट कार्ड आणि तारण कर्ज) मोठ्या बँकेत विलीन झाल्यास, त्यांची कर्जे आणि ठेवींमध्ये कमाल ३-६ टक्क्यांनी वाढ होईल. कोटक महिंद्रा बँक आणि इंडसइंड बँकेला या कराराचा खूप फायदा होऊ शकतो. 6 / 10कोटक महिंद्राच्या कर्ज आणि ठेवींमध्ये १३ टक्क्यांची आणि इंडसइंड बँकेची २० टक्क्यांनी वाढ होईल. सिटी बँक इंडियाचे सध्या २.६ दशलक्ष क्रेडिट कार्ड वापरकर्ते आहेत. हे एकत्र केल्यास कोटक आणि इंडसइंड बँकेची ग्राहकसंख्या दुप्पट होईल. 7 / 10बचत ठेवींच्या आधारे कोटक ३० टक्क्यांनी आणि इंडसइंड बँक ६० टक्क्यांनी वाढेल. सिटी बँकेने भारतासह एकूण १३ देशांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये ऑस्ट्रेलिया, बहरीन, चीन, इंडोनेशिया, कोरिया, मलेशिया, फिलिपिन्स, पोलंड, रशिया, तैवान, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे.8 / 10तब्बल ११९ वर्षांपूर्वी म्हणजे १९०२ मध्ये सिटी बँक भारतात आली. त्यांची पहिली शाखा कोलकाता शहरातून सुरू झाली. सिटीबँक ग्रुप भारतातील क्रेडिट कार्ड, रिटेल बँकिंग, होम लोन आणि वेल्थ मॅनेजमेंटमध्ये व्यवहार करतो. 9 / 10या बँकेच्या भारतात ३५ शाखा आहेत आणि सध्या ग्राहक बँकिंग व्यवसायात सुमारे ४००० कर्मचारी कार्यरत आहेत. भारतातील सिटीबँकच्या एकूण ग्राहकांबद्दल बोलायचे झाले, तर ही संख्या सुमारे २९ लाख आहे. या बँकेत १२ लाख खाती असून एकूण २२ लाख ग्राहकांकडे सिटी बँकेचे क्रेडिट कार्ड आहे.10 / 10जेव्हापासून सिटी बँकेने भारतीय बाजारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हापासून त्याच्या ग्राहकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यांचा बाजारातील हिस्सा सतत कमी होत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications