radhakishan damani DMart revenue jumps upto 46 percent to rs 7649 crore in second quarter
DMart ची दमदार कामगिरी! दुसऱ्या तिमाहीत महसूल ७ हजार कोटींवर; ४६ टक्क्यांची मोठी वाढ By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 11:54 AM1 / 10आताच्या घडीला देशभरात सुपर मार्केट साखळी असलेल्या अनेक बड्या कंपन्या कार्यरत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात आघाडीवर असलेले एक मोठे नाव म्हणजे DMart. डीमार्टची मालकी असलेल्या अव्हेन्यू सुपरमार्टस या कंपनीची दुसऱ्या तिमाहीतील कामगिरी उंचावली आहे. 2 / 10देशातील श्रीमंत उद्योजकांपैकी एक असलेल्या राधाकिशन दमानी यांच्या मालकीची अव्हेन्यू सुपरमार्ट्स कंपनी आहे. अव्हेन्यू सुपरमार्ट्सने भांडवली बाजारात जोरदार एंट्री घेतली होती. 3 / 10नुकताच कंपनीने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली. ज्यात ३० सप्टेंबर २०२१ अखेर कंपनीला ७६४९.६४ कोटींचा महसूल मिळाला. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४६.६ टक्के वाढ झाली. 4 / 10गेली वर्षी याच तिमाहीत कंपनीला ५२१८.१५ कोटींचा महसूल मिळाला होता. दमानी मुख्य प्रवर्तक असलेल्या DMart चे महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक यासह इतर राज्यांमध्ये २४६ स्टोअर्स आहेत. 5 / 10कोरोना संकटापूर्वीच्या वर्षात २०१९-२० मधील दुसऱ्या तिमाहीत कंपनीला ५९४९.०१ कोटींचा महसूल मिळाला होता. DMart च्या महसुलात दुसऱ्या तिमाहीत ४६.६ टक्के वाढ झाली असून ७६४९.६४ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.6 / 10शेअर बाजारात अव्हेन्यू सुपरमार्टचा शेअर ४२३९.२५ रुपयांवर आहे. गेल्या शुक्रवारच्या सत्रात त्यात ०.११ टक्के घट झाली. अव्हेन्यू सुपरमार्टच्या शेअरने भांडवली बाजारात यापूर्वी ४४९५ रुपयांचा सार्वकालीन उच्चांकी स्तर गाठला आहे.7 / 10दरम्यान, अव्हेन्यू सुपरमार्ट लिमिटेडचे राधाकृष्ण दमानी आता सुपर मार्केट चेनची साखळी वाढवण्याच्या विचारात असून, हरियाणामध्ये व्यवसाय विस्ताराची योजना आखली आहे. हरियाणामधील फरीदाबाद येथे एक स्टोअर खरेदी करण्यावर करारपत्र झाले असल्याची माहिती मिळाली आहेत. 8 / 10दिल्लीलगत असलेल्या एनसीआरनंतर फरीदाबाद येथे DMart चे दुसरे मोठे स्टोअर असणार आहे. फरीदाबाद सेक्टर ७५ मध्ये १.५७ एकर जागेवर तीन मजल्यांचे मोठे स्टोअर उभारण्यात येणार आहे. 9 / 10सन २००२ मध्ये डीमार्टची सुरुवात झाली होती. गेल्या १५ वर्षांत डीमार्ट ही मोठी सुपर मार्केट चेन झाली आहे. गेल्या वर्षभरात कंपनीने गुंतवणूकदारांना १०० टक्के परतावा दिल्याचे सांगितले जात आहे. 10 / 10कमी किमतीत ग्राहकांना उत्तम, दर्जेदार सामान उपलब्ध करून देणे हा डीमार्टचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. सन २०१७ मध्ये अव्हेन्यू सुपरमार्ट लिस्टेड कंपनी झाली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications