शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rakesh Jhunjhunwala चे शेअर मार्केटमधील ‘गुरु’ कोण?; केलीय तब्बल २ लाख कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 6:31 PM

1 / 12
शेअर मार्केटमध्ये अनेकजण आपले नशीब आजमवण्यासाठी गुंतवणूक करत असतात. मात्र, पद्धतशीरपणे आणि अभ्यासपूर्वक गुंतवणूक केल्यास योग्य परतावा आणि नफा कमावू शकतो, असे सांगितले जाते. आताच्या घडीला शेअर मार्केट तेजीत आहे.
2 / 12
शेअर मार्केटमध्ये कोट्यवधी लोकांची गुंतवणूक आहे. मात्र, शेअर मार्केटमधील बिगबूल म्हणून ओळख असलेल्या Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलियोकडे शेकडो गुंतवणूकदारांची नजर असते. राकेश झुनझुनवाला यांच्यानुसार अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात.
3 / 12
मात्र, Rakesh Jhunjhunwala हे एकटे शेअर मार्केटमधील बिगबूल नसून, त्यांच्यापेक्षाही अधिक गुंवतणूक असलेली एक व्यक्ती शेअर मार्केटमध्ये आहे. राकेश झुनझुनवाला यांचा गुंतवणुकीतील बाप म्हणून या व्यक्तीकडे पाहिले जाते. या व्यक्तीने आताच्या घडीला शेअर मार्केटमध्ये लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे सांगितले जात आहे.
4 / 12
ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून, अॅव्हेन्यू सुपरमार्टच्या माध्यमातून डीमार्टसारखी मोठी सुपर मार्केट चेन उभारणारे राधाकिशन दमानी (Radhakishan Damani) आहेत. Rakesh Jhunjhunwala हेदेखील राधाकिशन दमानी यांना शेअर मार्केटमधील आपला गाइड आणि गुरुच मानतात, असे सांगितले जाते.
5 / 12
राधाकिशन दमानी यांनी आतापर्यंत शेअर मार्केटमध्ये तब्बल २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे सांगितले जात आहे. ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत राधाकिशन दमानी यांनी आपल्या डिराइव्ह ट्रेडिंग आणि ब्राइट स्टार्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून VST मधील हिस्सा वाढवून ३२.३० टक्के केला आहे. जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत हाच हिस्सा ३०.२० टक्के होता.
6 / 12
यासह मंगलम ऑरगॅनिक्समधील हिस्सा २.२ टक्क्यांनी वाढवून ४.३ टक्के, तर ब्लू डार्टमधील हिस्सा १.७० वरून १.५० टक्के घटवल्याचे सांगितले जाते. याशिवाय मेट्रोपोलीस हेल्थकेअरमधील हिस्साही १.६ टक्क्यांवरून १.४ टक्के केला आहे.
7 / 12
दुसरीकडे राकेश झुनझुनवाला यांनी शेअर मार्केटमध्ये २४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे सांगितले जात आहे. राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबर तिमाहीत टाटा समूहाच्या एका कंपनीत गुंतवणूक वाढवली असून, राकेश झुनझुनवाला यांची टाटा समूहाच्या तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. सप्टेंबर तिमाहीत त्यांनी टाटा कम्युनिकेशन्समधील गुंतवणूक वाढवली.
8 / 12
कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार झुनझुनवाला यांचा कंपनीतील हिस्सा १.०४ टक्क्यांवरून १.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे. झुनझुनवाला यांनी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या नावाने या कंपनीत गुंतवणूक केली आहे. त्याच्याकडे कंपनीचे ३० लाख ७५ हजार ६८७ शेअर्स आहेत.
9 / 12
राकेश झुनझुनवाला यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर त्यांना या महिन्यामध्ये १२ ते २० टक्क्यांदरम्यान परतावा मिळाला आहे. यामुळेच झुनझुनवाला यांना अल्पवधीमध्ये चांगला घसघशीत नफा झाला आहे.
10 / 12
राकेश झुनझुनवाला यांनी केवळ २० दिवसांमध्ये ६४.३० कोटी रुपये कमवले आहेत. या दोन शेअर्समधून झुनझुनवाला यांनी ऑक्टोबरच्या पहिल्या २० दिवसांमध्ये १११ कोटी रुपये कमवले आहेत.
11 / 12
आताच्या घडीला Rakesh Jhunjhunwala यांच्याकडे Man Infraconstruction चे ३० लाख शेअर्स, Anant Raj कंपनीचे सुमारे १ कोटींचे स्टॉक, Tata Motors कंपनीचे ३,७७,५०,००० शेअर्स, Titan Stocks कंपनीचे ९६,४०,५७५ लाख शेअर्स आणि Delta Corp कंपनीचे ८५,००,००० शेअर्स आहेत.
12 / 12
औषध निर्मिती करणारी कंपनी Wockhardt ने या कंपनीच्या शेअर्सने गेल्या १ वर्षात ५७ टक्के रिटर्न दिले आहेत. या कंपनीत राकेश झुनझुनवाला यांचा २.२६ टक्के हिस्सा आहे. तर दुसरीकडे झुनझुनवाला दांपत्याचा Agro Tech Foods मध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत ८.२ टक्के हिस्सा होता. वर्षभरात या शेअर्समध्ये ४४ टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाshare marketशेअर बाजार