Anant Ambani Radhika Merchant Wedding :अनंत अंबानी पेक्षा वयाने मोठी आहे राधिका मर्चंट, जाणून घ्या किती आहे दोघांमधील अंतर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 11:08 IST
1 / 9देशातील श्रीमंत कुटुंबांपैकी एक अंबानी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. राधिका मर्चंट हिच्याशी अनंतचा साखरपुडा नुकताच पार पडला.2 / 9लग्नाअगोदर या कपलने नुकतेच तिरुमला हिल्स येथे पोहोचले. तिथे त्यांनी श्री व्यंकटेश मंदिरात दर्शन घेतले. सोशल मीडियावर त्यांचे फोटो, व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले. 3 / 9राधिका आणि अनंत आधीपासूनच एकमेकांचे चांगले मित्र आहेत. देशातील मोठे उद्योगपती वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची राधिका ही एकुलती एक मुलगी आहे. राधिका उत्तम भरतनाट्यम डान्सर आहे. तिने ८ वर्ष भरतनाट्यमचे शिक्षण घेतले आहे.4 / 9मात्र खूप कमी जणांना माहित असेल की राधिका अनंतपेक्षा वयाने मोठी आहे. होय. दोघेही एकमेकांना लहानपणीपासून ओळखतात. अनेक वर्ष एकमेकांच्या संपर्कात राहिल्यावर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. 5 / 9अनंत अंबानी अंबानी कुटुंबातील सर्वात धाकटा मुलगा आहे. त्याचा जन्म १० एप्रिल १९९५ सालचा आहे. तर राधिकाचा जन्म १८ डिसेंबर १९९४ रोजी झाला आहे. म्हणजेच राधिका अनंतपेक्षा १ वर्षांनी मोठी आहे.6 / 9राधिकाचे कुटुंब अंबानी कुटुंबाला अनेक वर्षांपासून ओळखते आणि राधिका या देखील नीता अंबानींच्या खूप जवळ आहेत.7 / 9राधिका मर्चंट यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे आणि एओ पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएट आहे.8 / 9आपल्या होणाऱ्या सूनेसाठी गेल्या वर्षी नीता अंबानी यांनी अरंगेत्रम सेरेमनीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बॉलिवुड कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.9 / 9सध्या अनंत अंबानी हे त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. अंबानी देशातील गर्भश्रीमंत कुटुंब आहे मात्र तितकेच परंपरांना जोडलेले आहेत हे वेळोवेळी दिसून आलं आहे.