शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुकेश अंबानींच्या ₹१५००० कोटींच्या अँटिलियापेक्षाही मोठ्या घरात राहतात राधिकाराजे गायकवाड; माहितीये कोण आहेत त्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 8:41 AM

1 / 6
तुम्ही लक्ष्मी विलास पॅलेसचं नाव ऐकलं असेल. लक्ष्मी विलास पॅलेस गुजरातमध्ये आहे. त्याची मालकी बडोद्याच्या गायकवाड कुटुंबाकडे आहे. हे जगातील सर्वात मोठं खाजगी निवासस्थान म्हणून ओळखलं जातं. लक्ष्मी विलास पॅलेस बकिंगहॅम पॅलेसपेक्षा चौपट मोठा आहे.
2 / 6
गायकवाड हे एकेकाळी बडोद्याचे शासक होते. आजही स्थानिक लोक त्यांच्याकडे मोठ्या आदराने पाहतात. सध्या एचआरएच समरजितसिंग गायकवाड हे या कुटुंबाचे नेतृत्व करत आहेत. राधिकाजे गायकवाड यांच्याशी त्यांचा विवाह झालाय.
3 / 6
राधिकाजे गायकवाड यांचा जन्म १९ जुलै १९७८ रोजी झाला. त्या गुजरातच्या वांकानेर राज्यातील आहेत. डॉ. एम. के. रणजितसिंह झाला असं त्यांच्या वडिलांचं नाव. आयएएस अधिकारी होण्यासाठी त्यांनी आपल्या शाही उपाधीचा त्याग केला होता.
4 / 6
राधिकाराजे गायकवाड यांना शिक्षणाची अतिशय आवड आहे. त्या लेखिकादेखील आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून भारतीय इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. २००२ मध्ये महाराजा समरजितसिंह गायकवाड यांच्याशी विवाह करण्यापूर्वी राधिकाजे गायकवाड यांनी पत्रकार म्हणून काम केलं होतं.
5 / 6
रिपोर्ट्सनुसार, लक्ष्मी विलास पॅलेस ३,०४,९२,००० स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेला आहे. त्या तुलनेत बकिंगहॅम पॅलेस ८ लाख २८ हजार ८२१ चौरस फुटांमध्ये बांधण्यात आला आहे. जगातील सर्वात महागडं निवासस्थान मानलं जाणारे मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाची किंमत १५,००० कोटी रुपये असून ते ४८,७८० चौरस फुटांमध्ये पसरलेलं आहे.
6 / 6
आलिशान लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये १७० हून अधिक खोल्या आहेत. महाराजा सयाजीराव गायकवाड तृतीय यांनी १८९० मध्ये लक्ष्मी विलास पॅलेस उभारला होता. त्यावेळी त्याची किंमत सुमारे १,८०,००० ब्रिटिश पौंड होती. याशिवाय राजवाड्यात गोल्फ कोर्सही आहे.
टॅग्स :businessव्यवसाय