शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Railway ची ही कंपनी देतेय छप्परफाड परतावा, कॉन्ट्रॅक्ट मिळताच शेअर बनला रॉकेट; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 4:29 PM

1 / 8
जर आपण रेल्वेची इंफ्रास्ट्रक्चर कंपनी रेल्वे विकास निगम लिमिटेडच्या (RVNL) शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल, तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून या कंपनीच्या स्टॉकमध्ये सातत्याने तेजी दिसत असून, त्याने 52 आठवड्यांतील विक्रमी उच्चांक गाठला आहे.
2 / 8
या शेअरमध्ये बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जवळपास अडीच टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. यापूर्वी मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनवर नजर टाकली असता बीएसईवर हा शेअर 6 टक्क्यांच्या तेजीसह 58.05 रुपयांवर पोहोचून बंद झाला आहे.
3 / 8
गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये सुमारे 67 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. एक महिन्यापूर्वी 17 ऑक्टोबरला रेल्वे विकास निगम लिमिटेडचा (RVNL) शेअर 37.80 रुपयांवर होता. यानंतर त्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
4 / 8
52 आठवड्यांतील निच्चांकी पातळी 29 रुपये - या शेअरमध्ये केवळ 20 ऑक्‍टोबरलाच काहीशी घसरण दिसून आली होती. 52 आठवड्यांतील शेअरची सर्वात खालची पातळी 29 रुपये, तर सर्वोच्च पातळी 64.25 रुपये एवढी आहे. हा शेअरने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वोच्च पातळीला स्पर्ष केला आहे.
5 / 8
म्हणून दिसून येतेय तेजी - गेल्या तीन महिन्यांसंदर्भात बोलायचे झाल्यास, हा शेअर 100 टक्क्यांहून अधिकच्या तेजीसह दुपटीपेक्षाही अधिकने वधारला आहे. या शेअरच्या तेजी मागील कारणा म्हणजे, केल्या काही दिवसांत कंपनीला मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स मिळाल्या आहेत. यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. आरव्हीएनएलला 11 नोव्हेंबरला उथुरु थिला फल्हू-द्वीप (UTF) हार्बरच्या विकासाच्या नावाने मालदीवमध्ये आंतरराष्‍ट्रीय प्रकल्पांत यशस्वी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
6 / 8
भारत सरकारच्या या प्रकल्पासाठी जवळपास 1544.60 कोटी रुपये एढा खर्च येणार आहे. यापूर्वी 4 नोव्हेंबरला कंपनीकडून माहिती देण्यात आली होती, की पूर्व मध्य रेल्वेअंतर्गत धनबाद डिव्हिजनमध्ये 137.55 कोटी रुपयांचा ठेका निश्चित झाला होता.
7 / 8
याच बरोबर, 20 ऑक्टोबरला आरव्हीएनएलच्या वतीने, त्यांना एएमसी सेक्‍टर पॅकेज 2 आणि 3 मध्ये खारीकट कालव्याच्या विकासासाठी कंत्राट देण्यात आले. त्याची एकूण किंमत 484 कोटी रुपये एवढी होती.
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक