शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Railway Waiting List: तिकिटावर लिहिलेल्या WL, RSWL, PQWL, GNWL सारख्या कोड्सचा अर्थ काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 3:18 PM

1 / 10
ट्रेनने लांबचा प्रवास करताना, सहसा प्रत्येकजण आधी रिझर्वेशन करतो. पण तिकीटांसाठी इतकी मारामारी असते की काही वेळा कन्फर्म तिकीट मिळणं हे फार अवघड काम बनून जातं.
2 / 10
मात्र, प्रवाशांचा हा त्रास कमी करण्यासाठी रेल्वेकडून विविध उपाययोजना केल्या जातात. तरीही अनेकांची तिकिटे वेटिंग लिस्टमध्येच असतात. जर तुम्ही सर्व वेटिंग तिकिटे सारखीच आहेत अशी मानण्याची चूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक, वेटिंग तिकिटांचेही अनेक प्रकार आहेत.
3 / 10
जेव्हा रेल्वे प्रवासासाठी रेल्वे तिकीट बुक केले जाते तेव्हा 10-अंकी पीएनआर (Passenger Name Record) क्रमांक दिला जातो. हा एक युनिक कोड नंबर आहे. ज्यामध्ये तिकिटाशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाते.
4 / 10
वेटिंग लिस्ट (WL) - तुम्ही तिकीट बुक करता तेव्हा अनेकदा त्यावर WL कोड लिहिलेला येतो. म्हणजे वेटिंग लिस्ट. हा वेटिंग लिस्टमधील सामान्य कोड आहे. येथे तुम्हाला तुमचे तिकीट कन्फर्म होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. समजा तिकिटात GNWL 7/WL 6 लिहिलेले असेल तर तुमची वेटिंह लिस्ट 6 आहे. म्हणजे जर तुमच्या पूर्वीच्या सहा प्रवाशांनी त्यांचं तिकिट रद्द केलं तर तुमचं तिकिट कन्फर्म होईल.
5 / 10
PQWL - याचा अर्थ पूल्ड कोटा वेटिंग लिस्ट आहे. जेव्हा तुम्ही लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या मार्गावर येणाऱ्या कोणत्याही दोन स्थानकांदरम्यान प्रवास करता. जर तिकीट वेटिंग लिस्टमध्ये आले तर ते PQWL वेटिंग लिस्टमध्ये जाते. जेव्हा त्या भागातील प्रवाशाने तिकीट रद्द केले, त्यानंतरच यामध्ये तिकीट कन्फर्म होईल. समजा तुम्ही एखाद्या छोट्या स्टेशनवरून प्रवास सुरू केला आणि तुमचे तिकीट PQWL मध्ये असेल, तर तुमच्या भागातील कोणीतरी तिकीट रद्द करेल तेव्हाच तुमचे तिकीट कन्फर्म होईल.
6 / 10
RSWL - कधीकधी रोड साइड स्टेशन वेटिंग लिस्ट (RSWL) कोड तिकीटावर लिहिलेला असतो. हा कोड तयार होतो जेव्हा ट्रेनच्या सुरुवातीच्या स्थानकांपासून रोड साईड स्टेशन किंवा त्याच्या जवळ असणाऱ्या स्टेशनच्या जवळून हबुक केले जाते तेव्हा हा कोड येतो. अशा तिकिटांची कन्फर्म होण्याची शक्यता कमी असते.
7 / 10
RLWL - रिमोट लोकेशन वेटिंग लिस्टमध्ये तिकीट कन्फर्म होण्याची सर्वाधिक शक्यता असते. लहान स्थानकांच्या बर्थचा हा कोटा आहे. या इंटरमीडिएट स्टेशनवर वेटिंग तिकिटांना RLWL कोड देण्यात आला आहे.
8 / 10
TQWL - ही तत्काळ कोटा वेटिंग लिस्ट आहे. तत्काळमध्ये तिकीट बुक करताना वेटिंग लिस्टमध्ये नाव दिसल्यास हा कोड मिळतो. हे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता फारच कमी असते.
9 / 10
CAN - जर तुम्ही आपलं तिकीट कॅन्सल करता त्यानंतर जी प्रिन्टआऊट येते त्यावर CAN हा कोड लिहिलेला असतो. याचा अर्थ तिकीट कॅन्सल करण्यात आलेलं आहे.
10 / 10
CNF - जर तुमच्या रिझर्वेशन तिकिटावर CNF असा कोड लिहिला असेल आणि बर्थ अलॉटमेंट झालेलं नाही. अशा परिस्थितीत तुमची सीट कन्फर्म आहे, परंतु चार्ट तयार झाल्यानंतर सीट नंबर अलॉट केला जाईल.
टॅग्स :railwayरेल्वे