शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रेल्वेचा मोठा निर्णय! आता ट्रेनमध्ये एसी इकॉनॉमी कोच नसणार, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 11:29 AM

1 / 7
नवी दिल्ली : ट्रेनने प्रवास करण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन रिझर्व्हेशन करताना आता तुम्हाला एसी इकॉनॉमी क्लासचा ऑप्शन मिळणार नाही. रेल्वे मंत्रालयाने या क्लासचा कोच सरेंडर करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कोच देखील आता सामान्य थर्ड एसी कोच असणार आहे. एसी इकॉनॉमी क्लास सरेंडर करण्याच्या निर्णयामागील कारण जाणून घ्या...
2 / 7
रेल्वे मंत्रालयाने गेल्या वर्षी स्लीपर आणि एसी थर्ड क्लासदरम्यान हा क्लास सुरू केला होता. ज्याचे भाडे स्लीपर पेक्षा जास्त पण थर्ड एसी पेक्षा कमी होते. स्लीपरमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसीमध्ये प्रवास करता यावा हा त्याचा उद्देश होता. त्यासाठी कोचमधील बर्थची संख्या वाढवण्यात आली होती.
3 / 7
सामान्य थर्ड एसी क्लास कोचमध्ये 72 बर्थ असतात, तर त्यामध्ये 83 बर्थ होते. यासोबतच या कोचमध्ये पुस्तके वाचण्यासाठी स्वतंत्र दिवे, एसी व्हेंट्स, यूएसबी पॉइंट्स, प्रत्येक बर्थवर मोबाइल चार्जिंग पॉइंट्स, वरच्या बर्थवर चढण्यासाठी चांगल्या शिडी आणि खास स्नॅक टेबल्स बनवण्यात आले होते.
4 / 7
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बर्थची संख्या वाढवण्यासाठी सीट्समधील थोडे अंतर ठेवून लेनन (ब्लँकेट) स्टोरेज काढण्यात आले. या कारणास्तव, ब्लँकेटला एसी इकॉनॉमीमध्ये दिले गेले नाही.
5 / 7
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या क्लासमध्ये प्रवास करणारे प्रवासी सतत ब्लँकेटची मागणी करत होते. प्रवाशांचा असा तर्क होता की सामान्यत: एसी क्लासचे प्रवासी ब्लँकेट घेऊन प्रवास करत नाहीत. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन यापूर्वी रेल्वेने या क्लासमधील प्रवाशांनाही ब्लँकेट देण्यास सुरुवात केली आहे.
6 / 7
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एका ब्लँकेटसाठी सरासरी 60 ते 70 रुपये प्रति ट्रिप खर्च येतो. यामध्ये धुण्यापासून ते ठराविक वेळेनंतर काढण्यापर्यंतच्या सर्व गोष्टींचा समावेश होतो. या कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ब्लँकेट दिल्याने रेल्वेवर अतिरिक्त बोजा पडत होता.
7 / 7
यामुळे रेल्वेने एसी इकॉनॉमी सरेंडर करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 463 एसी इकॉनॉमी क्लास आणि 11277 थर्ड एसी कोच आहेत. मात्र आता दोन्ही क्लासच्या कोचची संख्या 11740 झाली आहे.
टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे