Rajya Sabha passes bill to hike FDI in insurance sector to 74 percent nirmala sitharaman
विमा क्षेत्रात ७४ टक्के FDI ला राज्यसभेची मंजुरी; निर्मला सीतारामन म्हणाल्या, "देशातच राहणार प्रिमियमचा पैसा" By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 1:02 PM1 / 15देशाचा अर्थसंकल्प मांडतना अर्थमंत्री निर्मल सीतारामन यांनी विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक ७४ टक्के करणार असल्याचं सांगितलं होतं. 2 / 15दरम्यान, आता देशातील विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक ही ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के करणारं विमा सुधरणा विधेयक २०२१ हे राज्यसभेत पारित करण्यात आलं. 3 / 15यावर संसदेत झालेल्या चर्चेनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याच्याशी निगडीत समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. 4 / 15विमा क्षेत्रातील प्रिमिअमच्या माध्यमातून मिळणाऱ्या रक्कमेसंदर्भात विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला होता. 5 / 15यावर उत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी देशातील विमा क्षेत्र हे सर्वाधिक रेग्युलेटेड क्षेत्र असल्याचं म्हटलं. 6 / 15तसंच विमा उत्पादनपासून त्यातील उत्पादन, गुंतवणूक त्याचं मार्केटिंग हे सर्व नियामक ठरवत असल्याचंही त्या म्हणाल्या. 7 / 15तसंच सरकारनं विमा क्षेत्रातून येणारा पैसा हा देशातच गुंतवला जाईल याची कायद्यात तरतूद केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 8 / 15विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूकीची कमाल मर्यादा ७४ टक्के इतकी निश्चित केली जात आहे. याचा अर्थ ही अनिवार्य अट नाही किंवा अचानक कंपन्यांकडे इतकी गुंतवणूकही येईल, असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. 9 / 15कंपन्या आपल्या गरजेनुसार निर्णय करू शकतील. जर त्यांना पैशांची आवश्यकता असेल तर आम्ही त्यांना का रोखावं? असा सवालही त्यांनी केला. 10 / 15१९९१ मध्ये देशाची अर्थव्यवस्था खुली करण्याचा फायदा झाला. याचा लाभ आपण सर्वच जण घेत आहोत. यासाठी पी.व्ही. नरसिम्हा राव आणि मनमोहन सिंग यांना त्याचं श्रेय दिलं गेलं पाहिजे, असंही त्या म्हणाल्या. 11 / 15त्यांच्याकडे संख्याबळ नव्हतं त्यावेळी त्यांनी या सुधारणा केल्या. प्रश्न हा आहे की आपण हा लाभ या ठिकाणी थांबवून पुढे जाऊ इच्छितो का? विमा क्षेत्राचा विस्तार होत आहे त्यांना निधीची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 12 / 15यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारतवरही भाष्य केलं. थेट परकीय गुंतवणूकीतून मिळणारा पैसा याच ठिकाणी गुंतवला जाईल. इथे या पैसा कमवा आणि पळून जा असं आम्ही म्हणत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 13 / 15यावेळी एका खासदारानं विजय माल्याचं नावदेखील घेतलं. यावर निर्मला सीतारामन यांनी पलटवार करत विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी या सर्वांना आपण परत आणतोय आणि ही आत्मनिर्भरता आहे. त्यांना देशाच्या कायद्याचा सामना करावा लागणार असल्याचंही सीतारामन यांनी सांगितलं. 14 / 15दरम्यान, ही गुंतवणूक ७४ टक्के करताना नियामन इरडाशी आपण विस्तृत चर्चा केल्याचंही त्या म्हणाल्या. 15 / 15थेट परकीय गुंतवणूकीचं ध्येय हे लाईफ इन्श्युरन्स अनेकांपर्यंत पोहोचवणं हे असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आणखी वाचा Subscribe to Notifications