शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rakesh Jhunjhunwala Akasa Air: राकेश झुनझुनवालांची आकासा एअर जून पासून घेणार उड्डाण; बिझनेस क्लासही नसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 4:35 PM

1 / 6
बिग बुल राकेश झुनझुनवाला (Big Bull Rakesh Jhunjhunwala) यांची एअरलाइन 'आकासा एअर' (Akasa Air) या वर्षी जूनपासून त्यांचे व्यावसायिक ऑपरेशन सुरू करण्याची शक्यता आहे. आकासा एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे (Vinay Dube) यांनी 'विंग्स इंडिया 2022' परिषदेच्या एका सत्राला संबोधित करताना ही अपेक्षा व्यक्त केली.
2 / 6
“आम्ही सर्व नियामक आवश्यकता आणि परवाना ऑपरेशन्स पूर्ण करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) यांच्याशी एकत्र काम करत आहोत,” असं दुबे यांनी सांगितलं. आकासा एअर ब्रांड नावानं एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड (SNV Aviation Pvt. Ltd.) भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात उतरत आहे.
3 / 6
येत्या पाच वर्षांत विमान कंपनीकडे ७२ विमानांचा ताफा असणे अपेक्षित आहे. कामकाज सुरू झाल्यापासून पहिल्या १२ महिन्यांत १८ विमानांचा ताफा तयार करण्याची योजना आहे आणि त्यानंतर एअरलाइन दरवर्षी १२-१४ विमानांची भर पडेल, असंही त्यांनी नमूद केलं.
4 / 6
आम्ही विमान सेवा सुरू करून प्रवाशांच्या सेवेत येण्यासाठी आतुर आहोत. सुरूवातीच्या टप्प्यात आकासा एअरची उड्डाणे मेट्रो शहरांमधून टियर २ आणि टियर ३ शहरांसाठीच असतील, असंही दुबे यांनी स्पष्ट केलं. विमान कंपनीला ऑक्टोबर २०२१ मध्ये नागरी उड्डयन मंत्रालयाकडून हवाई वाहतुकीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळालं होतं.
5 / 6
अकासा एअरच्या संस्थापकांमध्ये जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे आणि इंडिगो एअरलाइनचे माजी अध्यक्ष आदित्य घोष यांचा समावेश आहे. आकासा ही अल्ट्रा लो कॉस्ट कॅरियर नसून लो कॉस्ट कॅरिअर असेल असं दुबे यांनी आधीच सांगितलं आहे. म्हणजेच ही बजेट एअरलाइन असेल.
6 / 6
आकासा फ्लाइटमध्ये अन्न गरम करण्यासाठी ओव्हन नसतील. प्रवाशांनी पॅक केलेला उपमा/नूडल्स/पोहे/बिर्याणी असेच पदार्थ मिळतील. याशिवाय या विमानांमध्ये एकच श्रेणी असणार आहे. यामध्ये बिझनेस क्लास किंवा प्रीमिअम क्लासही नसेल.
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवाला