शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या Star Health च्या IPO ची एन्ट्री; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 11:34 AM

1 / 7
Star Health and Allied Insurance IPO : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची गुंतवणूक असलेली कंपनी स्टार हेल्थ अँड अलायड इंश्योरेन्स (Star Health and Allied Insurance) कंपनीचा IPO ३० नोव्हेंबर रोजी खुला झाला.
2 / 7
या आयपीओद्वारे कंपनीची ७२४९ कोटी रूपये जमवण्याची इच्छा आहे. या आयपीओचा प्राईस बँड ८७० ते ९०० रूपयांच्या दरम्यान आहे. कंपनी फ्रेश इश्यूनं जमवलेल्या रकमेचा वापर कंपनीचा कॅपिटल बेस वाढवण्यासाठी करणार आहे.
3 / 7
दरम्यान, कंपनीचा इश्यू खुला होण्यापूर्वी ग्रे मार्केटमध्ये याच्या प्रीमियमची किंमत १० रूपये कमी झाली होती. कंपनीने आपल्या बीएसई फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, अँकर गुंतवणूकदारांना ९०० रुपये प्रति शेअर या किमतीने ३,५७,४५,९०१ इक्विटी शेअर्सचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हालाही या IPO मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर काही गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
4 / 7
जर तुम्हालाही यात गुंतवणूक करायची असेल तर याचा आयपीओ हा ३० नोव्हेंबर रोजी खुला झाला आहे. तसंच हा आयपीओ २ डिसेंबरपर्यंत खुला राहणार आहे. प्राईस बँडच्या हिशोबानं कंपनी ७२४९ कोटी रूपये जमवण्याच्या तयारीत आहे.
5 / 7
या आयपीओअंतर्गत कंपनी २ हजार कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करण्यात येणार आहे.तसंच ५२४९ कोटी रूपयांचे इक्विटीची ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विक्री केली जाणार आहे.
6 / 7
स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या आयपीओच्या लॉटसाठी बोली लावली जाऊ शकते. एका लॉटमध्ये एकूण १६ शेअर्स आहेत. या प्रकारे एका गुंतवणूकदाराला एका लॉटसाठी १४४०० रूपये गुंतवावे लागतील. कमीतकमी इतक्या पैशांची गुंतवणूक करावीच लागेल.
7 / 7
स्टार हेल्थ इन्शुरन्सरच्या शेअर्सचं लिस्टिंग १० नोव्हेंबर रोजी लिस्ट होण्याची शक्यता आहे. कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE वर लिस्ट होऊ शकतात. जर तुम्हाला यात पैसे गुंतवायचे असतील तर तज्ज्ञांच्या आणि जाणकारांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करावी.
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाIPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंग