शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

1985 मध्ये 5 हजार रुपयांनी केली सुरुवात; राकेश झुनझुनवालांनी असं उभारलं अब्जावधीचं साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 6:11 PM

1 / 7
Rakesh Jhunjhunwala Death Anniversary : शेअर मार्केटमध्ये 'बिग बुल' नावाने ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. झुनझुनवाला यांनी 1985 मध्ये केवळ 5000 रुपयांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी BSE सेन्सेक्स 150 अंकांवर असायचा.
2 / 7
त्यांनी ज्या शेअरवर हात ठेवला, त्याचं सोनं केलं. त्यांनी शेअर बाजारात आपली पकड इतकी मजबूत केली, त्यांना भारतीय शेअर बाजाराचे वॉरेन बफे म्हटले जाऊ लागले. त्यांनी लाखो लोकांना मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी, हे शिकवले. झुनझुनवाला यांचा जन्म 5 जुलै 1960 रोजी झाला होता, तर 14 ऑगस्ट 2022 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
3 / 7
राकेश झुनझुनवाला 1985 मध्ये अवघे 5000 रुपये घेऊन शेअर बाजारात दाखल झाले. 1985 मध्ये बीएसई सेन्सेक्स 150 अंकांच्या जवळ होता. त्या काळात लोकांना शेअर बाजाराबद्दल फार कमी माहिती होती. लोकांना शेअर बाजार म्हणजे सट्टा वाटायचा. त्याकाळी लोकांचा विश्वास फक्त बँक एफडीवर होता.
4 / 7
त्यावेळी राकेश झुनझुनवाला दलाल स्ट्रीटमध्ये घुसले. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या झुनझुनवाला यांनी 5000 रुपयांतून अब्जावधीचे साम्राज्य उभारले. राकेश झुनझुनवाला यांच्या वडिलांनी त्यांना शेअर बाजारात येण्यास कधीही मनाई केली नव्हती, परंतु यासाठी त्यांनी आर्थिक मदतही केली नाही.
5 / 7
राकेश झुनझुनवाला एकदा म्हणाले होते की, 'माझ्याकडून कोणत्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा करू नको, असे वडिलांनी स्पष्टपणे सांगितले होते. वडील म्हणायचे, शेअर मार्केटमध्ये लोक तुझ्यावर विश्वास ठेवून येतील, त्यांचा विश्वास कधीही तोडू नको.
6 / 7
राकेश झुनझुनवाला अनेकदा गुंतवणुकदारांना सट्टा टाळण्याचा आणि शेअर्सची योग्य काळजी घेण्याचा सल्ला द्यायचे. त्यांनी नेहमी फास्ट रिटर्न्सपेक्षा दीर्घकालीन गुंतवणुकीला अधिक महत्त्व दिले. झुंजनवाला म्हणायचे की हवामान, मृत्यू आणि बाजाराचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही.
7 / 7
झुनझुनवाला यांनी त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रवासात हा महत्त्वाचा धडा शिकला की, गुंतवणूकदाराने शेअर बाजाराबद्दल स्वतःचे संशोधन करणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी स्वतःसाठी वेळ काढावा. गुंतवणूकदाराने बाजारातील नवीन ट्रेंडसह अपडेटेड रहावे, जेणेकरून गुंतवणुकीच्या चांगल्या संधी मिळू शकतील.
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाbusinessव्यवसायshare marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजार