शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३० हजार कोटींच्या संपत्तीची मालकी कुणाकडे? Rakesh Jhunjhunwala यांचे मृत्यूपत्र आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 1:50 PM

1 / 12
शेअर मार्केटमधील बिग बुल आणि भारताचे वॉरेन बफेट मानले जाणारे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे अलीकडेच निधन झाले. राकेश झुनझुनवाला यांचे अकाली जाणे अवघ्या शेअर मार्केटसाठी मोठा धक्का होता. राकेश झुनझुनवाला यांची कारकीर्द अतिशय प्रेरणादायी होती. अल्प कालावधीत पूर्ण अभ्यास करून राकेश झुनझुनवाला यांनी आपले साम्राज्य उभे केले होते.
2 / 12
Rakesh Jhunjhunwala यांचा पोर्टफोलियो पाहूनच हजारो गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीची दिशा ठरवत असत. राकेश झुनझुनवाला अतिशय अभ्यासू होते. मिळालेल्या माहितीनुसार, आता राकेश झुनझुनवाला यांचे एक मृत्यूपत्र समोर आल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये त्यांनी आपली सुमारे ३० हजार कोटींची संपत्ती कुणाला मिळणार, याबाबत लिहून ठेवल्याचे सांगितले जात आहे.
3 / 12
सूत्रांच्या माहितीनुसार, Rakesh Jhunjhunwala यांनी एक मृत्यूपत्र करुन ठेवले आहे. राकेश झुनझुनवाला ज्यांची मालमत्ता सुमारे ३० हजार कोटी रुपये असल्याचे मानले जाते, त्यांनी शेअर्स आणि मालमत्तेसह त्यांची मालमत्ता पत्नी आणि तीन मुलांना दिली जावी यासाठी व्यवस्था केली होती.
4 / 12
Rakesh Jhunjhunwala यांची मालमत्ता त्यांची पत्नी आणि तीन मुलांकडे जाणार आहे. हे राकेश झुनझुनवालांच्या मालमत्तेचे वारस मानले जाणार आहेत. राकेश झुनझुनवाला यांना तीन मुले आहेत - मुलगी निष्ठा आणि जुळी मुले, आर्यमन आणि आर्यवीर. राकेश झुनझुनवाला हे दानाला चौथे अपत्य मानत होते. रेखा झुनझुनवालाही मोठ्या संपत्तीची मालक आहेत.
5 / 12
Rakesh Jhunjhunwala यांच्या मालमत्तेचा काही भाग त्याच्या आवडत्या धर्मादाय संस्थेला दिला जाऊ शकेल, असे सांगितले जात आहे. राकेश झुनझुनवालांचे दीर्घकाळचे कायदेशीर सहकारी बरजीस देसाई हे मृत्युपत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सर्व हिंदू विधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत मृत्युपत्राचे वाचन करण्यात येणार आहे.
6 / 12
देसाई हे Rakesh Jhunjhunwala यांना गेल्या २५ वर्षांपासून ओळखतात. ते Akasa Air या नवीन विमान वाहतूक उपक्रमाचे सह-संचालक होते. मी एक छोटीशी गुंतवणूक केली आहे. विमान वाहतूक हा उच्च जोखमीचा, जास्त परतावा देणारा व्यवसाय आहे आणि सामान्यत: लोकांचा त्याबद्दल नकारात्मक दृष्टीकोन असतो. पण मला विश्वास आहे की, यातून मोठी भरभराट होईल. झुनझुनवाला यांच्या व्यावसायिक कौशल्यावर ही एक पैज आहे, असे देसाई म्हणाले होते.
7 / 12
Rakesh Jhunjhunwala यांच्या सूचीबद्ध मालमत्तांची किंमत ३० हजार कोटी रुपये आहे, त्यांच्या स्थावर मालमत्तेत मुंबईच्या मलबार हिलमधील इमारत, सन २०१३ मध्ये स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडून १७६ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली होती तसेच लोणावळ्यातील हॉलिडे होम यांचा समावेश आहे.
8 / 12
Rakesh Jhunjhunwala यांना ३५ कंपनी होल्डिंगचे मालक म्हणूनही ओळखले जाते. बांधकाम आणि करार (११ टक्के), विविध (९ टक्के), बँका, खाजगी क्षेत्र (६ टक्के), वित्त (६ टक्के), बांधकाम आणि करार (नागरी) (६ टक्के) ही त्यांची प्रमुख गुंतवणूक आहे. फार्मास्युटिकल्स (६ टक्के), आणि बँका (सार्वजनिक क्षेत्र) (३ टक्के).
9 / 12
दरम्यान, Rakesh Jhunjhunwala यांच्या ट्रस्टचे काम त्यांचे विश्वासू मित्र, मार्गदर्शक आणि अनुभवी गुंतवणूकदार-उद्योजक राधाकिशन दमानी हाताळणार असल्याचे समजते. नी राकेश झुनझुनवाला ट्रस्टच्या मुख्य विश्वस्तपदाची सूत्रं हाती घेतली आहेत. अन्य दोन विश्वस्तांमध्ये कल्पराज धरणशी आणि अमल पारीख यांचा समावेश आहे. हे दोघेही झुनझुनवाला यांचे अत्यंत विश्वासार्ह सोबती आहेत.
10 / 12
Rakesh Jhunjhunwala यांची कंपनी रेयर एंटरप्रायझेस (Rare Enterprises) च्या व्यवस्थापनाची जबाबदारी राकेश झुनझुनवाला यांचे दोन सहकारी उत्पल सेठ आणि अमित गोएला हे यांच्याकडेच राहिल. उत्पल सेठ झुनझुनवाला यांना गुंतवणुकीसाठी मदत करत होते आणि गेल्या काही वर्षांपासून प्रामुख्याने प्रायव्हेट इक्विटी इनव्हेस्टमेंटवर लक्ष केंद्रित करत होते.
11 / 12
अमित गोएला हे ट्रेडिंगच्या बाबतीत Rakesh Jhunjhunwala यांचा राईड हँड मानले जात होते. तसंच ते स्वतंत्रपणे कंपनीचे ट्रेडिंग बुक सांभाळत होते. राकेश झुनझुनवालांनी आपल्या पत्नी आणि तीन मुलांसाठी लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपन्यांमधील गुंतवणूकीसह अब्जावधींची मालमत्ता मागे ठेवली आहे.
12 / 12
फोर्ब्सनुसार Rakesh Jhunjhunwala हे भारतातील ४८ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांच्या एकूण संपत्तीचे मूल्य ५.८ अब्ज डॉलर्सची आहे. सध्याच्या किंमतीनुसार त्यांच्या लिस्टेड होल्डिंग्सची किंमत ३० हजार कोटी रुपये आहे.
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाshare marketशेअर बाजार