शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rakesh Jhunjhunwala यांना पुन्हा मोठा धक्का! ‘या’ टॉपच्या ६ कंपन्यांमुळे ५९०० कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 5:42 PM

1 / 12
गेल्या अनेक महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या प्रंचड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस विविध क्षेत्रातील अनेकविध कंपन्या आपले IPO ही सादर करताना पाहायला मिळत आहेत.
2 / 12
शेअर मार्केटमधील बिग बूल नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांना हजारो गुंतवणूकदार फॉलो करत असतात. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोप्रमाणे आपल्या गुंतवणुकीत बदल करत असतात. याचा अनेकांना मोठा फायदा होत असल्याचे सांगितले जाते.
3 / 12
Rakesh Jhunjhunwala यांची आताच्या घडीला अब्जावधी रुपयांची गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये असल्याचे म्हटले जाते. मात्र, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमधील टॉपच्या ६ कंपन्यांमुळे ५९०० कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
4 / 12
Rakesh Jhunjhunwala यांच्या टॉप होल्डिंग स्टॉकमध्ये लक्षणीय घट झाली आहे. मूल्याच्या बाबतीत, त्याच्या पोर्टफोलिओमध्ये १००० कोटी किंवा त्याहून अधिक मूल्य असलेले सर्व ६ स्टॉक्स गडगडलेले पाहायला मिळत आहेत.
5 / 12
Rakesh Jhunjhunwala यांना जवळपास ५९०० कोटींचा झटका बसला आहे. यामध्ये Titan Company, Star Health, CRISIL, Escorts Limited, Tata Motors आणि Metro Brands या कंपन्यांचा समावेश असून, सर्वाधिक नुकसान टायटन कंपनीचा शेअर पडल्याने झाले आहे.
6 / 12
Titan कंपनीचा शेअर २३७७ रुपयांपर्यंत घसरला. एका सत्रात या कंपनीच्या शेअर्स ७७ रुपयांची कोसळला. Rakesh Jhunjhunwala यांच्याकडे टायटन कंपनीचे ४५,२५०,९७० शेअर्स आहेत. या शेअर्समुळे मूल्य ३४८४ कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
7 / 12
Star Health कंपनीच्या शेअर्समध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली. हा शेअर ७२६ रुपयांवरून ७०४ रुपयांपर्यंत खाली आला. म्हणजेच प्रति शेअर २२ रुपयांनी घसरल्याचे दिसून आले. Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीचे १००,७५३,९३५ शेअर्स आहेत. या अर्थाने या शेअर्सचे मूल्य २२१६ कोटींनी कमी झाले.
8 / 12
Metro Brands च्या शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळाली. हा शेअर ५४९ रुपयांवरून ५२६ रुपयांवर आला आहे. म्हणजेच प्रति शेअर 23 रुपयांनी कमी झाला. Rakesh Jhunjhunwala पोर्टफोलिओमध्ये कंपनीचे ३९,१५३,६०० शेअर्स आहेत. या अर्थाने या शेअर्सचे मूल्य ९० कोटींनी कमी झाले.
9 / 12
बाजारातील घसरणीत Tata Motors चा शेअर ४९४ रुपयांवरून ४७७ रुपयांपर्यंत घसरला. म्हणजेच प्रति शेअर १७ रुपयांची घसरण दिसून आली आहे. Rakesh Jhunjhunwala यांचा कंपनीत ०.१ टक्के हिस्सा आहे आणि त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ३९,२५०,००० शेअर्स आहेत. या अर्थाने त्यांच्या शेअर्सचे मूल्य ६७ कोटींनी कमी झाले.
10 / 12
Escorts लिमिटेडच्या शेअर्सही कोसळले. या कंपनीचा १८६१ रुपयांवर असलेला शेअर १८५० रुपयांपर्यंत घसरला. Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीचे ६,४००,००० शेअर्स आहेत. प्रति शेअर ११ रुपयांच्या घसरणीने या शेअर्सचे मूल्य ७ कोटींनी कमी झाले आहे.
11 / 12
CRISIL चे शेअर्सही घसरले आहेत. या कंपनीचा २७८५ रुपयांवर असलेला शेअर २७२१ रुपयांपर्यंत घसरला. Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीचे ४,०००,००० शेअर्स आहेत. यामुळे या शेअर्सचे मूल्य २५.६ कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
12 / 12
याशिवाय Rakesh Jhunjhunwala यांना गेल्या दोन महिन्यांत १३४० कोटींचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमधील एका शेअरमुळे कोट्यवधी रुपये बुडाल्याचे म्हटले जात आहे.
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाshare marketशेअर बाजार