शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rakesh Jhunjhunwala यांना जबर फटका; मे महिन्यात १४०० कोटी बुडाले, नुकसान वाढले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 7:47 PM

1 / 9
देशासह जगभरातील अनेक घटनांचे प्रतिकूल पडसाद भारतातील शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत. शेअर बाजाराचे बिग बूल अशी ओळख असलेल्या Rakesh Jhunjhunwala यांनाही बाजारातील पडझडीचा मोठा फटका बसला आहे. मे महिन्यात तब्बल १४०० कोटींचे नुकसान राकेश झुनझुनवाला यांना सोसावे लागले आहे.
2 / 9
राकेश झुनझुनवाला यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनाही याचा मोठा फटका बसला आहे. शेअर मार्केटमधील ३ कंपन्यांच्या शेअर्समुळे Rakesh Jhunjhunwala यांना मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.
3 / 9
टाटा समूहाच्या टायटन या कंपनीचे शेअर्स ४.६० टक्के वाढले आणि तिचे मार्केट कॅप १,९८,५९३ कोटींवर पोहोचले. मात्र, यापूर्वी या कंपनीचे शेअर मोठ्या प्रमाणावर घसरले होते. Rakesh Jhunjhunwala यांची टायटनमधील गुंतवणूक १०,०२८.९६ कोटी रुपये होती, जी यापूर्वी ११,०२५ कोटी रुपये होती. अशाप्रकारे ९९६ कोटी रुपयांची घट झाली आहे.
4 / 9
स्टार हेल्थ इन्शुरन्स (Star Health and Insurance) आणि मेट्रो ब्रँड्स (Metro Brands) च्या शेअर्सच्या किंमतीत गेल्या महिन्याभरात मोठी घसरण दिसून आली आहे. मेट्रो ब्रँड्सचे शेअर ५६२ रुपयांवरून घसरून ५२३ रुपयांवर आला आहे.
5 / 9
तर दुसरीकडे स्टार हेल्थच्या शेअरची किंमत ७०० रुपयांवरून घसरून 663 रुपये प्रति शेअरवर आली आहे. दोन्ही शेअर्सच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे Rakesh Jhunjhunwala यांना तब्बल ५४० कोटी रूपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.
6 / 9
Rakesh Jhunjhunwala आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे स्टार हेल्थचे एकूण १०,०७,५३,९३५ शेअर्स आहेत. तर झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे मेट्रो ब्रँड्सचे ३९,१५३,६०० शेअर्स आहेत.
7 / 9
Rakesh Jhunjhunwala यांच्याकडे स्टार हेल्थ कंपनीच्या गेल्या एका महिन्यादरम्यान यात ३५.५५ रुपये प्रति शेअरची घसरण झाली. याचा अर्थ राकेश झुनझुनवाला यांना ३८८ कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.
8 / 9
तर, Rakesh Jhunjhunwala यांच्याकडे मेट्रो ब्राँड्सचेही शेअर्स आहेत. त्यात गेल्या महिन्याभराच्या कालावधीत ३९.०५ रुपये प्रति शेअरची घसरण झाली. यानुसार राकेश झुनझुनवाला यांचे १५२ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.
9 / 9
एका रिपोर्टनुसार, टायटनचा हिस्सा २,५९८ रुपयांपर्यंत जाऊ शकतो, जो सध्याच्या दरापेक्षा १५.७ टक्के अधिक आहे.
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाshare marketशेअर बाजारTataटाटा