rakesh jhunjhunwala made rs 6500 crore profit in star health and allied insurance company
Rakesh Jhunjhunwala मालामाल! ‘या’ कंपनीतील गुंतवणूक सुपरहीट; कमावले ६५०० कोटी By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 6:37 PM1 / 9गेल्या काही दिवसांमध्ये शेअर मार्केटमध्ये मोठा चढ-उतार पाहायला मिळत आहे. हजारो अंकांनी कोसळलेला बाजार आता काही प्रमाणात सावरताना दिसत आहे. यातच अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्यांचे IPO येऊन बाजारात धडकत आहेत. 2 / 9यातच आता बिग बुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Rakesh Jhunjhunwala यांना एका कंपनीच्या गुंतवणुकीतून मोठा लाभ झाला असून, केवळ काही दिवसांतच राकेश झुनझुनवाला यांनी ६ हजार ५०० कोटी रुपये कमावल्याचे सांगितले जात आहे. 3 / 9Star Health इंशुरन्स कंपनीमधील गुंतवणुकीचा Rakesh Jhunjhunwala यांना मोठा फायदा झाला आहे. स्टार हेल्थ कंपनीच्या IPO कडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र असले, तरी राकेश झुनझुनवाला मात्र मालामाल झाले आहेत.4 / 9Star Health and Allied Insurance कंपनीचा शेअर हा मार्केटमध्ये लिस्टिंग झाला आहे. या कंपनीच्या IPO कडे किरकोळ गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे.5 / 9या कंपनीचा IPO ९०० रुपयांच्या प्राइजवर खुला करण्यात आला होती. मात्र, ५.६९ रुपयांनी शेअर घसरले होते. नंतर शेअर मार्केटमधील तेजीचा फायदा या कंपनीला पोहोचला आणि स्टार हेल्थचा शेअरने चांगलीच झेप घेतली. आताच्या घडीला तो ९४० रुपयांवर पोहोचला आहे. 6 / 9Rakesh Jhunjhunwala यांना या कंपनीतील गुंतवणुकीमुळे ६ पट फायदा झाला असून, या गुंतवणुकीतून राकेश झुनझुनवाला यांना तब्बल ६५०० रुपयांचा फायदा झाला आहे. या कंपनीत राकेश झुनझुनवाला यांचा हिस्सा १४.९८ टक्के आहे. 7 / 9Rakesh Jhunjhunwala यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांचीही स्टार हेल्थ कंपनीत गुंतवणूक असून, त्यांच्याकडे ३.२३ टक्के हिस्सा आहे. यानुसार, राकेश झुनझुनवाला आणि पत्नी रेखा झुनझुनवाला यांची स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीत एकूण १७.२६ टक्के हिस्सेदारी आहे. याची एकूण किंमत ९ हजार ४७० कोटींच्या घरात आहे. 8 / 9स्टार हेल्थ कंपनीच्या ७ हजार २४९ कोटींच्या IPO ला केवळ ७९ टक्के बोली मिळू शकली. या IPO अंतर्गत कंपनीने २ हजार कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी केले होते. तर, ५२४९ कोटी रूपयांचे इक्विटीची ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्री केली जाणार होती.9 / 9केवळ मागील दोन महिन्यात Rakesh Jhunjhunwala यांनी शेअर मार्केटच्या माध्यमातून तब्बल १२६ कोटींची कमाई केली आहे. यामध्ये टाटा ग्रुपसह अन्य काही कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांतील गुंतवणुकीने राकेश झुनझुनवाला यांना भरघोस रिटर्न्स दिल्याचे पाहायला मिळत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications