शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rakesh Jhunjhunwala चा धमाका! २ कंपन्यांमुळे १११ कोटींची कमाई; तुम्ही घेतलेत का ‘हे’ ५ शेअर्स?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 4:17 PM

1 / 12
Big Bull म्हणून ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलियोमध्ये असलेल्या शेअर्सपैकी पाच शेअर्सने गेल्या एका वर्षात ३३० टक्क्यांपर्यंत रिटर्न दिले आहेत.
2 / 12
तसेच दिग्गज उद्योगपती राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबर तिमाहीत टाटा समूहाच्या एका कंपनीत गुंतवणूक वाढवली असून, राकेश झुनझुनवाला यांची टाटा समूहाच्या तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. सप्टेंबर तिमाहीत त्यांनी टाटा कम्युनिकेशन्समधील (TATA Communications) गुंतवणूक वाढवली.
3 / 12
कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार झुनझुनवाला यांचा कंपनीतील हिस्सा १.०४ टक्क्यांवरून १.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे. झुनझुनवाला यांनी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या नावाने या कंपनीत गुंतवणूक केली आहे. त्याच्याकडे कंपनीचे ३० लाख ७५ हजार ६८७ शेअर्स आहेत.
4 / 12
यातच आता राकेश झुनझुनवाला यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर त्यांना या महिन्यामध्ये १२ ते २० टक्क्यांदरम्यान परतावा मिळाला आहे. यामुळेच झुनझुनवाला यांना अल्पवधीमध्ये चांगला घसघशीत नफा झाला आहे.
5 / 12
राकेश झुनझुनवाला यांनी नॅशनल अॅल्यूमिनियम कंपनी लिमिटेड म्हणजेच नॅल्कोमध्येही गुंतवणूक केली होती. जूलै ते सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये झुनझुनवाला यांच्याकडे नॅल्कोचे दोन कोटी ५० लाख इक्विटी शेअर्स होते. म्हणजेच कंपनीमधील १.३६ टक्के हिस्सेदारी त्यांच्याकडे होते.
6 / 12
पहिल्यांदाच झुनझुनवाला यांनी अशाप्रकारे सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमध्ये एवढा काळ शेअर्स होल्ड करुन ठेवले होते. राकेश झुनझुनवाला यांच्याबरोबरच LIC चाही नॅल्कोमध्ये १.१ टक्के वाटा आहे.
7 / 12
राकेश झुनझुनवाला यांच्याकडे असणाऱ्या तीन बँकांच्या शेअर्सपैकी एक कॅनरा बँक आहे. गेल्या महिन्यामध्ये क्यूआयपीच्या माध्यमातून त्यांनी कॅनरा बँकेमध्ये २ कोटी ८८ लाख ५० हजार शेअर्स घेतले. यापैकी एका शेअरची किंमत १० लाख रुपये इतकी आहे. तर ३० सप्टेंबर रोजी झुनझुनवाला यांचे २ कोटी ९० लाख ९७ हजार ४०० शेअर्स म्हणजेच एकूण वाट्यापैकी १.६ टक्के वाटा कंपनीमध्ये आहे.
8 / 12
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सची किंमत १२.७७ टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे. सध्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचे ट्रेडिंग १९५.१० रुपये प्रती शेअर दराने सुरु आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीच्या १.६ टक्के शेअर्सची सप्टेंबर अखेरीस किंमत ५०३.३८ कोटी इतकी होती. या शेअर्सची किंमत वाढल्याने आता त्यांचे एकूण मूल्य ५६७.६९ कोटी इतके झाले आहे.
9 / 12
राजेश झुनझुनवाला यांनी केवळ २० दिवसांमध्ये ६४.३० कोटी रुपये कमवले आहेत. या दोन शेअर्समधून झुनझुनवाला यांनी ऑक्टोबरच्या पहिल्या २० दिवसांमध्ये १११ कोटी रुपये कमवले आहेत.
10 / 12
आताच्या घडीला Rakesh Jhunjhunwala यांच्याकडे Man Infraconstruction चे ३० लाख शेअर्स, Anant Raj कंपनीचे सुमारे १ कोटींचे स्टॉक, Tata Motors कंपनीचे ३,७७,५०,००० शेअर्स, Titan Stocks कंपनीचे ९६,४०,५७५ लाख शेअर्स आणि Delta Corp कंपनीचे ८५,००,००० शेअर्स आहेत.
11 / 12
औषध निर्मिती करणारी कंपनी Wockhardt ने या कंपनीच्या शेअर्सने गेल्या १ वर्षात ५७ टक्के रिटर्न दिले आहेत. या कंपनीत राकेश झुनझुनवाला यांचा २.२६ टक्के हिस्सा आहे. तर दुसरीकडे झुनझुनवाला दांपत्याचा Agro Tech Foods मध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत ८.२ टक्के हिस्सा होता. वर्षभरात या शेअर्समध्ये ४४ टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.
12 / 12
गुंतवणूकदारांची झुनझुनवाला यांच्या गुंतवणुकीवर आणि पोर्टफोलिओवर बारीक नजर असते. झुनझुनवाला यांनी जूनच्या तिमाहीत आणखी एका पीएसयू मेटल कंपनी सेलमध्ये (SAIL) १.३९ टक्के हिस्सा खरेदी केला होता.
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाshare marketशेअर बाजारTataटाटा