शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rakesh Jhunjhunwala: राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओत मोठे बदल; पत्नीने खरेदी केले 'या' 6 कंपन्यांचे शेअर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 8:13 PM

1 / 9
Rakesh Jhunjhunwala News: दिवंगत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचा हजारो कोटींचा पोर्टफोलिओ त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) सांभाळत आहेत. राकेश झुनझुनवाला यांचा या वर्षी ऑगस्टमध्ये मृत्यू झाला होता.
2 / 9
यानंतर त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये प्रथमच मोठा बदल करण्यात आला आहे. रेखा झुनझुनवाला यांनी सप्टेंबर तिमाहीत सहा कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले आहेत. यापैकी पाच कंपन्यांमध्ये त्यांनी आपली हिस्सेदारी वाढवली आहे. यासोबतच पोर्टफोलिओमध्ये नवीन स्टॉकचा समावेश करण्यात आला आहे.
3 / 9
टायटनमधील भागीदारी वाढवली- रेखा झुनझुनवाला यांची टायटन कंपनीतील हिस्सेदारी वाढली आहे. टायटन कंपनीतील त्यांचा हिस्सा सप्टेंबर तिमाहीपूर्वी 1.07 टक्के होता, तो आता 1.69 टक्के झाला आहे. तर, राकेश झुनझुनवाला यांची टायटनमध्ये होल्डिंग 3.85 टक्के आहे. झुनझुनवाला दाम्पत्याची टायटन कंपनीमध्ये 5.1 हिस्सेदारी आहे. टायटन कंपनीने सप्टेंबर तिमाहीत वार्षिक आधारावर विक्रीत 18 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
4 / 9
सिंगर इंडियामध्ये हिस्सा खरेदी केला- BSE वरील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवालांनी सिंगर इंडियामधील 42,50,000 शेअर्स किंवा 7.91 टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ नोंदवली गेली होती. कंपनीचे मार्केट कॅप अंदाजे रु. 374.94 कोटी अहे. 1851 मध्ये स्थापन झालेल्या सिंगर इंडियाचे शिवनकम आणि गृहोपयोगी वस्तू, असे दोन मोठे व्यवसाय आहेत.
5 / 9
टाटा कम्युनिकेशन्स- रेखा झुनझुनवाला डिसेंबर 2020 पासून टाटा कम्युनिकेशनमध्ये गुंतवणूक करत आल्या आहेत. सप्टेंबरमध्ये त्यांनी आपला हिस्सा 0.53 टक्केवरुन वाढवून 1.61 टक्के केला आहे.
6 / 9
टाटा मोटर्स- राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबर 2020 टाटा मोटर्सला आपल्या पोर्टफोलिओमध्ये सामील केले होते. त्यांची पत्नी रेखा यांनी सप्टेंबर 2022मध्ये आपला हिस्सा 1.09 वरुन वाढवून 1.11 केला होता.
7 / 9
फोर्टिस हेल्थकेअर- रेखा झुनझुनवाला यांनी सप्टेंबर 2017 मध्ये पहिल्यांदा फोर्टिसमध्ये गुंतवणूक केली होती. डिसेंबर 2020 च्या तिमाहीत त्यांनी आपले सर्व शेअर्स विकले. त्यांनी 2022मध्ये फोर्टिसला आपल्या पोर्टफोलिओमध्ये सामील केले. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत रेखा यांच्याकडे कंपनीचे 9,202,108 शेअर्स म्हणजेच 1.22 टक्के हिस्सा होता.
8 / 9
एनसीसी- रेखा झुनझुनवाला यांची एनसीसीमध्ये 2015 पासून भागीदारी आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत त्यांनी या कंपनीत आपला हिस्सा वाढवला होता. आधी त्यांची भागीदारी 12.48 होती आता ही वाढवून 12.64 झाली आहे.
9 / 9
किती कोटींचा पोर्टफोलिओ- सप्टेंबर 2022 च्या तिमाहीपर्यंत राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ 33,225.77 कोटी रुपयांचा होता. स्वतः राकेश झुनझुनवाला त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा पोर्टफोलिओ मॅनेज करायचे. राकेश झुनझुनवाला यांच्‍या मृत्यूनंतर त्यांचे शेअर्स आणि संपत्ती कुटुंबाकडे सोपवण्यात आली. आता रेखा झुनझुनवाला हा पोर्टफोलिओ पाहत आहेत.
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाshare marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजार