rakesh jhunjhunwala prediction came true about share market before six months ago know what he said
Rakesh Jhunjhunwala यांची भविष्यवाणी खरी ठरली! ६ महिन्यापूर्वी काय केले होते भाकित? जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 11:17 AM1 / 9रविवार, १४ ऑगस्टची सकाळ ही देशासाठी अतिशय दुःखदायक ठरली. सुरुवातीला शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनाची दुःखद बातमी आली आणि यामागून लगेचच शेअर मार्केटमधील बिग बुल आणि भारताचे वॉरेन बफेट मानले जाणारे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे निधन झाल्याची बातमी आली. आणि अवघा देश हळहळल्याचे सांगितले जात आहे. 2 / 9साधारण ६ महिन्यांपूर्वीची गोष्ट होती. दिल्लीत 'द कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री' (CII) चा कार्यक्रम होता. दिग्गज गुंतवणूकदार Rakesh Jhunjhunwala यांनी या कार्यक्रमामध्ये तात्विकपणे एका त्रिसूत्रीची भविष्यवाणी केली होती. या त्रिसूत्री बद्दल कोणीही अचूक भाकीत करू शकत नाही असे ही ते म्हणाले होते. अचानक राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाची बातमी आली आणि या दिग्गज गुंतवणूकदाराने ६ महिन्यांपूर्वी स्वतःच केलेली भविष्यवाणी खरी करत सर्वांनाच थक्क केले आहे.3 / 9Rakesh Jhunjhunwala यांनी फेब्रुवारीमध्ये सीआयआयच्या एका कार्यक्रमात म्हटले होते की, हवामान, मृत्यू आणि मार्केटचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. हवामान केव्हा बदलेल, मरण कधी येईल आणि मार्केट कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. तसे, झुनझुनवाला या कार्यक्रमात आणखी एका मुद्द्यावर बोलले ज्याबद्दल कोणीही अंदाज लावू शकत नाही.4 / 9ती म्हणजे 'स्त्री' होती. म्हणजेच 'हवामान, मृत्यू, मार्केट आणि स्त्रिया' याविषयी अंदाज बांधता येत नाही. शेअर मार्केटचा राजा कोणी नसतो. स्वत:ला राजा समजणारे आर्थर रोड जेलमध्ये पोहोचले. ते म्हणाले की, हवामान, मृत्यू, मार्केट, महिला याबाबत कोणीही भाकीत करू शकत नाही. मार्केट स्त्रीसारखे आहे, नेहमी प्रभावशाली, रहस्यमय, अनिश्चित आणि नाजूक, तुम्ही कधीही स्त्रीवर वर्चस्व गाजवू शकत नाही आणि त्याचप्रमाणे तुम्ही मार्केटवर कधीही वर्चस्व गाजवू शकत नाही, असे Rakesh Jhunjhunwala म्हणाले होते. 5 / 9मातीला जरी हात लावला तरी त्याचे सोने होईल, अशी Rakesh Jhunjhunwala यांची ख्याती होती. त्यांना पाहूनच लोक ठरवायचे की कोणत्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवायचे, कोणत्या स्टॉकमधून पैसे काढायचे. अवघ्या ५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर ते शेयर बाजारात उतरले आणि पुढे जे घडले ते एखाद्या परिकथेसारखेच होते. इतकेच नव्हे तर झुनझुनवाला यांचा जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे.6 / 9Rakesh Jhunjhunwala यांचे यश अफाट होते. शेअर बाजारात यशाची पताका फडकवणाऱ्या झुनझुनवाला यांनी स्वत:ची एअरलाइन अकासा एअर (Akasa Air) अलीकडेच सुरू केली. विशेष म्हणजे टाटा समूहाच्या केवळ एका शेअरने राकेश झुनझुनवाला यांचे नशीब बदलले होते. पण विमान वाहतूक क्षेत्रात पाऊल टाकून ते त्याच टाटा समूहाला टक्कर देत होते. टाटा समुहाने नुकतीच एअर इंडिया विकत घेतली आहे. याआधीही कंपनीकडे एअर एशिया आणि विस्तारा या दोन विमान कंपन्या आहेत. आकासा एअरच्या आगमनाने राकेश झुनझुनवाला यांची थेट स्पर्धा टाटा समुहाशी होती.7 / 9सन २००३ मध्ये Rakesh Jhunjhunwala यांनी टाटा समूहाची आणखी एक कंपनी टायटन कंपनीत गुंतवणूक केली. या एका शेअरने त्यांचे नशीब पालटले. त्यांनी ६ कोटी शेअर्स ३ रुपये किमतीत खरेदी केले. आज त्या एका शेअरची किंमत १,९६१.०० रुपये इतकी आहे. हा स्टॉक अजूनही त्यांचा आवडता स्टॉक आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स होते. यामध्ये सेल, टाटा मोटर्स, टाटा कम्युनिकेशन्स, ल्यूपिन, टीव्ही18, डीबी रियल्टी, इंडियन हॉटेल्स, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, फेडरल बँक, करूर वैश्य बँक, एस्कॉर्ट्स लिमिटेड, टायटन कंपनी या कंपन्यांचा समावेश आहे.8 / 9Rakesh Jhunjhunwala हे मुंबईतील सर्वात महागड्या व प्रतिष्ठित भागात १४ मजली आलिशान घर बांधत होते. सध्या ते एका अपार्टमेंट ब्लॉकमध्ये दुमजली घरात राहत होते. पण लवकरच त्यांचे नवीन निवासस्थान मलबार हिलमध्ये असणार होते. अनेक उद्योगपती आणि कॉर्पोरेट जगतातील नामवंत व्यक्ती या भागात राहतात. हे घर बांधण्यासाठी झुनझुनवाला यांनी ३७१ कोटी रुपयांना जमीन खरेदी केली होती. मलबार हिल हा मुंबईतील सर्वात महागडा परिसर मानला जातो.9 / 9Rakesh Jhunjhunwala यांनी १९८५ साली पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये पाऊल ठेवले. प्रथम ५ हजार रुपयांची गुंतवणूक केली आणि १९८६ मध्ये आपला पहिला नफा कमावला. त्यांनी टाटा टी चे शेअर्स ४३ रुपयांना विकत घेतले आणि तीन महिन्यांनी १४३ रुपये प्रति शेअर या दराने विकले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही आणि मग पुढील त्यांचा शेअर बाजारातील प्रवास हा भारतीय शेअर बाजाराच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. आणखी वाचा Subscribe to Notifications