शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rakesh Jhunjhunwala: खुर्चीवरील बैठक अन् चुरगाळलेला शर्ट, मोदींसोबतचा फोटो झाला होता व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 11:43 AM

1 / 10
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचे आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले, ते ६२ वर्षांचे होते. भारतातील वॉरेन बफे म्हणूनही त्यांना ओळखलं जायचं. नुकतीच त्यांनी काही दिवसांपूर्वी आपली एअरलाईन आकासाची सुरूवात केली होती.
2 / 10
आकासाच्या पहिल्या प्रवासादरम्यानही ते उपस्थित होते. शेअर मार्केटमध्ये त्यांच्या नावाचा चांगलाच दबदबा होता, त्यांचा फॉलोओर्स बेसही मोठा होता. मात्र, शेअर मार्केटमध्ये प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीमुळे देशभर प्रसिद्ध झाले होते.
3 / 10
राकेश झुनझुनवाला यांनी काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी, मोदींनीही झुनझुनवाला यांचं मोठं कौतुक केलं होतं, वन अँड ओन्ली राकेश झुनझुनवाला यांना भेटून आनंद
4 / 10
दृष्टीकोन बाळणारा, जिंदादील आणि भारत देशासाठी कायम आशावादी असणारा माणूस, अशा आशयाचे ट्विट मोदींनी केले होते. मात्र, मोदी आणि झुनझुनवाला यांची भेट वेगळ्याच कारणाने चर्चेत आली होती.
5 / 10
राकेश झुनझुनवाला यांचा शर्ट आणि पंतप्रधान मोदी उभे असतानाही ते खुर्चीवर बसल्याचा त्यांचा अॅटीट्यूट अनेकांना खटकसा आणि भावलाही होता. त्यामुळे, सोशल मीडियावर राकेश झुनझुनवाला नेमके आहेत तरी कोण? हे अनेकांची सर्च केले होते.
6 / 10
मोदींसोबतच्या भेटीवेळी त्यांच्या अंगातील शर्ट चुरगाळलेला होता, पांढऱ्या रंगाचा असल्याने तो अतिशय साधारण दिसत होता. मात्र, मला काहीही फरक पडत नाही. मला कुठे क्लायंट शोधायचे आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळी झुनझुनवाला यांनी दिली होती.
7 / 10
राकेश झुनझुनवाला यांनी कॉलेजच्या दिवसांपासूनच शेअर बाजारात गुंतवणूकीची सुरूवात केली होती. सुरूवातीला आपण १०० डॉलर्सची गुंतवणूक केल्याचंही एकदा राकेश त्यांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे त्यावेळी सेन्सेक्स इंडेक्स १५० अकांवर होता, जो आता ६० हजारांच्या स्तरावर आहे.
8 / 10
झुनझुनवाला यांची यशाची कहाणी केवळ ५ हजार रूपयांपासून सुरू होती. आज त्यांचं नेटवर्थ जवळपास ४० हजार कोटी रूपये एवढं आहे. त्यांच्या याच यशामुळे त्यांना भारतीय शेअर बाजाराचे बिग बुल आणि भारताचे वॉरेन बफे असं म्हटलं जातं.
9 / 10
जुलै 2022 अखेरीस त्यांची संपत्ती 5.5 अब्ज डॉलर इतकी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. राकेश झुनझुनवाला हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत 32 व्या स्थानी होते.
10 / 10
दरम्यान, आज त्यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून त्यांना श्रद्धांजली देखील देण्यात आली आहे. तर, झुनझुनवाला यांच्या निधनामुले भारतीय शेअर मार्केटचं मोठं नुकसान झालं अशी भावनाही व्यक्त होत आहे.
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाNarendra Modiनरेंद्र मोदीshare marketशेअर बाजारMumbaiमुंबई