Raksha Bandhan : You can give this 'Rakhi gift' to your beloved sister!
लाडक्या बहिणीला देऊ शकता हे ‘राखी गिफ्ट’! By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 10:58 AM1 / 8नवी दिल्ली : रक्षाबंधनाच्या सणाची बहिणी मोठ्या उत्साहाने वाट पाहात असतात. भावानेही बहिणीला या दिवशी नेमके काय गिफ्ट द्यायचे, याचा प्लान आखलेला असतो. परंतु यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त आपल्या बहिणीला भेटवस्तू देताना त्या आर्थिकदृष्ट्या मजबूत कशा होतील, याकडे लक्ष देता येईल. 2 / 8त्यासाठी तज्ज्ञांनी काही भेटवस्तू सुचविल्या आहेत. या बहिणीला आयुष्यभरासाठी उपयुक्त ठरू शकतील. रक्षाबंधनानिमित्त कपडे, दागिने अथवा अन्य वस्तू भेट देण्याऐवजी वित्तीय साधने भेट स्वरूपात दिल्यास बहीण आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल. तिला आयुष्यभर नियमित उत्पन्न मिळेल. तिचे भविष्य सुरक्षित होईल, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. 3 / 8ही भेट दिल्यास बहिणीचे आरोग्य सुरक्षित होईल. अचानक उद्भवू शकणाऱ्या खर्चातून सुटका होईल. बहिणीकडे आधीच विमा असेल, तर त्याचा हप्ता तुम्ही भरू शकता.4 / 8एलआयसीची ‘जीवन उमंग’ ही पॉलिसी उत्तम भेट ठरू शकते. १५ वर्षे १ लाखाचा वार्षिक हप्ता तुम्ही भरल्यास उर्वरित काळात बहिणीला दरवर्षी १ लाख रुपये मिळू शकणार आहेत. 5 / 8बहिणीच्या नावे बँकेत मुदत ठेवही (फिक्स्ड डिपॉझिट) तुम्ही ठेवू शकता. यावर व्याजही अधिक मिळते. एफडीची मुदत संपल्यानंतर बहिणीला मोठी रक्कम उपलब्ध होईल.6 / 8या खरेदीने घडणावळ खर्चाची बचत होते. दागिन्यांप्रमाणे चोरीला जाण्याचीही भीतीही नसते. यातून सोने खरेदी समाधान आणि आर्थिक लाभ अशा दोन्ही गोष्टी साध्य होतील.7 / 8चांगल्या कंपनीचे समभाग तुम्ही बहिणीला भेट म्हणून देऊ शकता. दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय म्हणून ब्लू चिप कंपन्यांचे समभाग बहिणीसाठी उत्तम ठरू शकतील.8 / 8बहिणीचे बँकेत खाते नसेल तर तिला एक बचत खाते काढून द्या. ओवाळणीचे पैसे त्यात जमा करा. यावर बहिणीला व्याजही मिळेल तसेच तिचे पैसेही सुरक्षित राहतील. आणखी वाचा Subscribe to Notifications