शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुकेश अंबानीसह संपूर्ण कुटुंब अयोध्येत; श्री राम मंदिर ट्रस्टला किती देणगी दिली?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 8:01 PM

1 / 10
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आज देशभरातून विविध VVIP अयोध्येला पोहचले होते. त्यात उद्योगपतींचाही समावेश होता. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हेदेखील संपूर्ण अंबानी कुटुंबासह अयोध्येत या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पोहचले होते.
2 / 10
मुकेश अंबानी यांच्यासोबत त्यांची पत्नी नीता अंबानी, मुलगी ईशा अंबानी, जावई आनंद पिरामल, मुलगा आकाश अंबानी,अनंत अंबानी, सून श्लोका उपस्थित होते. या संपूर्ण कुटुंबाने प्रभू रामाचे दर्शन केले. यावेळी पूर्ण कुटुंब मोठ्या उत्साहात आणि आनंदी दिसत होते.
3 / 10
मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाकडून राम मंदिर ट्रस्टला २.५१ कोटी रुपये दान म्हणून देण्यात आले. यावेळी मुकेश अंबानी यांनी प्रभू राम आले आहेत. संपूर्ण देशात २२ जानेवारीला दिवाळी साजरी केली जात आहे. मी या क्षणाचा साक्षीदार झालोय हे माझे भाग्य असल्याचे म्हटलं.
4 / 10
तर नीता अंबानी यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर भाष्य करताना सुरुवातीला जय श्री राम नारे दिले. त्यानंतर हा एक ऐतिहासिक दिवस असून मला माझ्या भारतीय संस्कृतीवर गर्व आहे असं सांगितले. तर आजचा दिवस ऐतिहासिक असून इतिहासात याची नोंद होईल असं आकाश अंबानी म्हणाले.
5 / 10
मुकेश अंबानी यांच्याशिवाय त्यांचे छोटे बंधू अनिल अंबानीही अयोध्येला पोहचले होते. या सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्यानगरी सजली. आजचा दिवस आमच्यासाठी पवित्र आहे. प्रभू रामाचे दर्शन घेऊन आम्ही धन्य झालो असं अंबानी कुटुंबाने भावना व्यक्त केली.
6 / 10
दरम्यान, राम मंदिर सोहळ्यामुळे संपूर्ण देशात नवचैतन्य पसरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यापुढे आपला राम तंबूत राहणार नाही तर भव्य अशा मंदिरात राहणार आहे अशी भावना यावेळी पंतप्रधान मोदींनी बोलून दाखवली.
7 / 10
त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान निवासस्थानी दीपप्रज्वलन केले. पंतप्रधानांनी श्री रामाच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन केले. पंतप्रधानांच्या निवासस्थानी प्रभू रामाचे नवीन चित्र लावण्यात आले आहे.
8 / 10
अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशभरात दीपोत्सव साजरा होत आहे. पंतप्रधान मोदींनी यावर ट्विट करत सांगितले की, आज राम लला अयोध्या धाममधील त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान आहेत. या शुभ प्रसंगी मी सर्व देशवासियांना विनंती करतो की त्यांनी राम ज्योती प्रज्वलित करून त्यांचे घरोघरी स्वागत करावे. जय सिया राम! असं आवाहन त्यांनी केले.
9 / 10
अयोध्येतील या सोहळ्यानंतर पीएम मोदींनी राम मंदिराच्या बांधकामात मदत करणाऱ् कारागिरांची भेट घेतली आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. यावेळी त्यांनी सियावरराम चंद्र की जय अशी घोषणा केली. त्यांनी सर्व बांधकाम कारागिरांचे राम मंदिरांच्या उभारणीसाठी मनापासून आभार मानले
10 / 10
राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. भाषणाच्या सुरुवातीलाच ते म्हणाले की आज आमचा राम आला आहे. २२ जानेवारी ही कॅलेंडरवर लिहिलेली तारीख नाही. हे नवीन कालचक्राचे मूळ आहे असं त्यांनी सांगितले.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदी