ramdev baba announced that ruchi soya to launch fpo next year
रामदेव बाबांची मोठी घोषणा; अनेकांना मिळणार कमाईची संधी By कुणाल गवाणकर | Published: November 16, 2020 7:32 PM1 / 10ग्राहकोपयोगी वस्तूंच्या आघाडीवर असलेल्या पतंजलीनं मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे अनेकांना कमाईची मोठी संधी मिळणार आहे.2 / 10पतंजलीनं अल्पावधीच भारतीय बाजारात महत्त्वाचं स्थान पटकावलं. कंपनीनं वेगानं मुसंडी मारत प्रस्थापित कंपन्यांना घाम फोडला.3 / 10पतंजली आयुर्वेदच्या अंतर्गत येणारी खाद्य तेल कंपनी रुची सोया पुढील वर्षी फॉलो-ऑन पब्लिक ऑफर आणणार आहे. रुची सोया खाद्य तेल निर्मिती क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी आहे.4 / 10रुची सोयामध्ये असणारी प्रवर्तकांची गुंतवणूक कमी करण्याचा निर्णय पतंजलीनं घेतला आहे. रामदेव बाबांनी याबद्दलची माहिती दिली.5 / 10पतंजली आयुर्वेदनं गेल्याच वर्षी रुची सोया कंपनी खरेदी केली. चालू आर्थिक वर्षात कंपनीची वेगानं वाढ होईल असा विश्वास रामदेव बाबांनी व्यक्त केला आहे.6 / 10पतंजलीनं गेल्या वर्षी तोट्यात गेलेली रुची सोया ४ हजार ३५० कोटी रुपयांना विकत घेतली. रुची सोया शेअर बाजारात नोंद असलेली कंपनी आहे.7 / 10सध्याच्या घडीला रुची सोयामध्ये प्रवर्तकांची ९९ टक्के गुंतवणूक आहे. कंपनीतील प्रवर्तकांची गुंतवणूक ७५ टक्क्यांवर आणण्याचं उद्दिष्ट पतंजलीनं ठेवलं आहे.8 / 10कंपनीतील प्रवर्तकांची गुंतवणूक कमी करण्यासाठी पुढील वर्षी एफपीओ जारी करेल, असं रामदेव बाबांनी सांगितलं.9 / 10जून २०२१ पर्यंत कंपनीतील प्रवर्तकांची गुंतवणूक १० टक्क्यांनी कमी करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. 10 / 10यानंतरच्या ३६ महिन्यांत कंपनी गुंतवणुकीतील आपला वाटा २५ टक्क्यांपर्यंत कमी करेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. आणखी वाचा Subscribe to Notifications