शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ratan Tata: टाटांच्या या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, ३५२₹ च्या डिव्हिडंटसह दिला २५३८% नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 3:06 PM

1 / 7
शेअर बाजारात योग्य आणि अभ्यासपूर्ण गुंतवणूक केली तर अनेकदा बंपर नफा निश्चित असतो. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यानं गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. बाजारातील घसरणीनंतरही या समभागांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.
2 / 7
आज आम्ही तुम्हाला टाटा समूहाच्या अशाच एका शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. या शेअरनं डिव्हिडंटसह गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. हा शेअर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या रतन टाटा समूहाच्या (Ratan Tata Group) कंपनीचा आहे. अलीकडेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडच्या (Tata Consultancy Services Limited) व्यवस्थापनात मोठा बदल झाला आहे.
3 / 7
टाटा समूहाची कंपनी टीसीएसने यापूर्वी आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हिडंट देण्याची घोषणा केली होती. TCS ने प्रति शेअर ३५२.५० रुपये डिव्हिडंट जाहीर केला होता. कंपनीनं २०१८ मध्ये १:१ च्या प्रमाणात बोनस जारी केला होता. टीसीएसच्या कामगिरीतही सुधारणा झाली आहे.
4 / 7
कोराना काळात मंदीच्या काळात कंपनीच्या सीएजीआरमध्येही सुधारणा झाली. तो १३ टक्क्यांवर पोहोचला होता. अलीकडेच कंपनीचे सीईओ आणि एमडी राजेश गोपीनाथन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजेश ६ वर्षे TCS चे नेतृत्व करत होते.
5 / 7
टीसीएसच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. TCS शेअर्सनं आतापर्यंत गुंतवणूकदारांना २५०० टक्क्यांहून अधिक मजबूत परतावा दिला आहे. २७ ऑगस्ट २००४ रोजी कंपनीच्या शेअर्सची किंमत १२०.३३ रुपये होती.
6 / 7
तेव्हापासून त्यात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे १७ मार्च २०२३ रोजी TCS चे शेअर्स ३१७५ रुपयांच्या पातळीवर बंद झाले. अशा प्रकारे, कंपनीच्या शेअर्सनं या कालावधीत गुंतवणूकदारांना २,५३८.५८ टक्क्यांचा मजबूत परतावा दिला आहे.
7 / 7
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओस्वाल यांनी टाटाच्या या शेअरला बाय रेटिंग दिलं आहे. तसंच खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. मोतीलाल ओस्वालनं यासाठी ३८१० रूपयांचं टार्गेट प्राईज ठेवलं आहे. (टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)
टॅग्स :share marketशेअर बाजारTataटाटाInvestmentगुंतवणूक