ratan tata company tata motors spoke against this demand of elon musk and show support to modi govt
TATA ग्रुपचा मोदी सरकारला पाठिंबा; एलन मस्कच्या ‘त्या’ मागणीला केला जोरदार विरोध By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 9:17 PM1 / 13आताच्या घडीला TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. TATA ग्रुपच्या अनेक कंपन्या भन्नाट रिटन्सही देत आहेत. तसेच टाटा आता नवनव्या क्षेत्रातही पदार्पण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 2 / 13TATA ग्रुप देशातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये TATA ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.3 / 13TATA ग्रुपमधील टाटा मोटर्स कंपनीने टेस्लाच्या एलन मस्क यांनी केलेल्या एका मागणीला जोरदार विरोध दर्शवला असून, मोदी सरकारच्या योजनेला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. 4 / 13अमेरिकेतील आघाडीची कार निर्माता कंपनी असलेली Tesla भारतात प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत आहे. हा प्रकल्प कर्नाटकात उभारला जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.5 / 13Tesla चे सीईओ एलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच भारतात जगातील कोणत्याही देशापेक्षा सर्वांत जास्त आयात शुल्क आकारले जाते असे म्हटले होते. तसेच आम्हाला आयात शुल्कामध्ये किमान तात्पुरती सवलत तरी मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.6 / 13एलन मस्क यांनी केलेल्या याच मागणीला TATA मोटर्सने विरोध दर्शवला आहे. टाटा मोटर्सच्या पॅसेंजर युनिटचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी म्हटले आहे की, एलन मस्क यांची मागणी केंद्र सरकारच्या FAME म्हणजेच फास्टर एडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हाइब्रिड आणि इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसीच्या विपरीत आहे. 7 / 13या पॉलिसीच्या माध्यमातून भारताला इलेक्ट्रिक वाहन उत्पादनचे केंद्र बनवण्याचे केंद्रातील मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. आयात शुल्क कमी करण्यापेक्षा स्थानिक पातळीवर उत्पादन करण्यावर भर द्यायला हवा. 8 / 13एलन मस्क यांच्या मागणीमुळे केंद्र सरकारच्या फेम प्रोग्रामचा उद्देश पूर्ण होणार नाही, असेही चंद्रा यांनी स्पष्ट केले आहे. आताच्या घडीला इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात TATA मोटर्सचा वाटा ९० टक्के आहे. 9 / 13TATA मोटर्सची Nexon EV प्रचंड लोकप्रिय ठरली असून, ती सर्वाधिक खपाची इलेक्ट्रिक कार ठरली आहे. तसेच अधिकाधिक कार इलेक्ट्रिक करण्याची तयारी टाटा मोटर्सने सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून TATA Tigor EV लॉन्च केली आहे. 10 / 13Tesla ही कंपनी कर्नाटकात इलेक्ट्रिक कार उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. यासाठी तब्बल ७ हजार ७२५ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे आणि यामुळे तब्बल अडीच लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.11 / 13इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात शुल्क कमी करण्याच्या टेस्ला कंपनीच्या मागणीवर भारत सरकार विचार करू शकते, पण त्यासाठी अमेरिकेच्या कंपनीला भारतामध्ये उत्पादन सुविधा उभारण्यासाठी गुंतवणूक करावी लागेल.12 / 13टेस्लाने भारतात आपल्या गाड्या तयार करण्याचा आणि कारखाना उभारण्यासाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यास सरकार टेस्लाच्या विनंतीवर विचार करेल. तसेच, या विषयावरील कोणताही निर्णय किंवा सूट केवळ एका विशिष्ट कंपनीसाठीच नव्हे तर संपूर्ण क्षेत्रासाठी लागू होईल, असे केंद्राने म्हटले होते. 13 / 13दरम्यान, टाटा मोटर्सने इन्व्हेस्टमेंट प्रमोशन अॅक्टिव्हीटीच्या एका भागाच्या रूपात गुजरात सरकारसोबत बंदरे आणि परिवहन विभागाद्वारे एक करार केला आहे. याचा उद्देश प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांचना स्क्रॅप करण्यासाठी एक नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग कारखाना उभारण्यासाठी मदत करणे आहे. या स्क्रॅपेज सेंटरमध्ये वार्षिक रिसायकलिंग क्षमता ३६ हजार वाहनांची असेल. आणखी वाचा Subscribe to Notifications