शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ratan Tata : रतन टाटांनी देशासाठी एवढे केले, जे कुणालाही जमणार नाही; सच्च्या देशभक्ताच्या या दहा गोष्टी...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 9:06 AM

1 / 13
Ratan Tata Death News : भारताचे ज्येष्ठ उद्योगपती टाटा समुहाचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे निधन झाल्याची रात्री बातमी आली. ही बातमी जगभरात वाऱ्यासारखी पसरली. त्यांनी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
2 / 13
रतन टाटा यांचे नाव भारतीय इतिहासात नेहमी सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. रतन टाटा यांनी जो वारसा सोडला त्याचा भारताच्या इतिहासात अभिमानाने उल्लेख केला जाईल. भारतात जेव्हा जेव्हा उद्योगपतींचा उल्लेख केला जातो तेव्हा सर्वात आधी रतन टाटांचे नाव घेतले जाते. रतन टाटा हे फक्त उद्योगपती नव्हते तर त्यांनी आयुष्यभर समाजाची सेवा केली आहे.
3 / 13
रतन टाटा यांना भारतीय उद्योगत जगताचे जनक म्हटले जाते. रतन टाटा यांनी भारतासाठी मोठं योगदान दिलं आहे. त्यांनी केलेली कामे जगाच्याही लक्षात राहतील.
4 / 13
१. कोरोना काळात देश मोठ्या अडचणीत सापडला होता. अशा कठीण काळात रतन टाटा देशाच्या मदतीला आले. त्यांनी देशाला मदत करण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे मोठे योगदान दिले. त्यांच्या या योगदानाची जगाने दखल घेतली होती.
5 / 13
२. रतन टाटा यांनी १९९१ ते २०१२ पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाने अनेक नवीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आणि आपले जागतिक अस्तित्व वाढवले. रतन टाटा यांनी टाटा हा इंटरनॅशनल बॅन्ड करुन दाखवला.
6 / 13
४. देशातील सामान्य वर्गासाठी रतन टाटा यांनी २००८ मध्ये जगातील सर्वात स्वस्त कार मॉडेल, टाटा नॅनोचे उद्घाटन केले. या कारची किंमत एक लाख रुपये होती.
7 / 13
४. रतन टाटा यांच्या नेतृत्वात आयटी सेक्टरमध्ये TCS जगभरात पसरली. ही टाटा समूहातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक आहे.
8 / 13
५. रतन टाटा यांनी जग्वार लँड रोव्हर, टीटीएसी सारख्या प्रतिष्ठित ब्रँड्सचे अधिग्रहण करून टाटा समूहाची आंतरराष्ट्रीय ओळख मजबूत केली.
9 / 13
६. रतन टाटा यांनी शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात मोठं काम केलं. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
10 / 13
७. रतन टाटा यांना श्वानांची खूप आवड होती. त्यांनी मुंबईत श्वानांसाठी रुग्णालय सुरू केले आहे. हे रुग्णालय नवी मुंबईत ५ मजली असून, यामध्ये २०० पाळीव प्राण्यांवर एकाच वेळी उपचार करता येतात. ते बांधण्यासाठी १६५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
11 / 13
८. रतन टाटा यांनी महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला, यात त्यांनी टाटा समुहात महिलांनी मोठी संधी दिली.
12 / 13
९. रतन टाटा यांनी नेहमीच नवीन गोष्टी आणि नवीन तंत्रज्ञानावर भर दिला आहे. त्यांनी टाटा समूहाला नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची प्रेरणा दिली, यातून कंपनीने अनेक नवीन उत्पादने आणि सेवा विकसित केल्या.
13 / 13
१०. रतन टाटा यांनी भारतात ठिकाणी कॅन्सर रुग्णालय सुरू केली. टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई, टाटा मेमोरियल सेंटर कोलकाता, टाटा मेमोरियल सेंटर चेन्नई, टाटा मेमोरियल सेंटर वाराणसी यासह देशातील अनेक शहरांमध्ये कॅन्सर रुग्णालये आहेत, यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होतो. सामान्यांना कमी पैशात येथे उपचार मिळतात.
टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटा