शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घरात ना फोन ना टीव्ही; कोट्यवधींचे मालक असूनही साधे आयुष्य जगतात रतन टाटांचे भाऊ ...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 6:01 PM

1 / 5
Ratan Tata Family: टाटांचं नाव ऐकलं की मनात विश्वासाची भावना येते. टाटा समूहाला रस्त्यापासून आकाशापर्यंत अन् सुईपासून समुद्रापर्यंत...सर्वच क्षेत्रात यशाच्या शिखरावर नेण्याचे श्रेय रतन टाटा यांना जाते. रतन टाटा हे नाव जितके मोठे आहे, तितकाच त्यांचा स्वभाव सामान्य आहे. अब्जो रुपयांची संपत्ती, पण तेवढाच साधेपणा. टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे बोलत नाही. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांना फारशी माहितीही नाही. फार कमी लोकांना माहित आहे की, रतन टाटा यांना एक लहान भाऊदेखील आहे, जो आज लाइमलाइटपासून दूर अतिशय साधे जीवन जगतो. साधेपणा इतका आहे की, करोडोंची संपत्ती असूनही ते 2BHK फ्लॅटमध्ये सामान्य माणसांसारखे राहतात.
2 / 5
कोण आहेत जिमी टाटा?- काही महिन्यांपूर्वी रतन टाटा यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर स्वतःचा एक जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत आणखी एक मुलगा होता, जो अगदी त्यांच्यासारखाच दिसत होता. तो मुलगा दुसरा कोणी नसून, त्यांचा धाकटा भाऊ जिमी नवल टाटा आहे. टाटांच्या व्यवसायात भागीदारी आणि अफाट संपत्ती असूनही जिमी टाटा साधे जीवन जगतात.
3 / 5
जिमी टाटा कुठे राहतात?- रतन टाटा यांचा भाऊ मुंबईत एका साध्या अपार्टमेंटमध्ये राहतो. ना आलिशान लाईफस्टाईल ना सुरक्षा रक्षक ना हाताखाली नोकरांची फौज...प्रचंड संपत्ती असूनही जिमी टाटा मुंबईतील कुलाबा येथे एका साध्या 2BHK अपार्टमेंटमध्ये लाईमलाईटपासून दूर राहतात. अनेकवेळा त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनाही ते टाटा कुटुंबाशी संबंधित किंवा द ग्रेट रतन टाटांचे भाऊ असल्याचे असल्याचे माहीत नसते.
4 / 5
ना मोबाईल, ना घरात टीव्ही - टाटा समूहाचा व्यवसाय हाताळण्याऐवजी जिमी यांनी आपला छंद निवडला. ते एक कुशल स्क्वॉशपटू आहे. विशेष म्हणजे, करोडो रुपयांची संपत्ती असूनही, त्यांच्याकडे ना मोबाईल फोन आहे, ना घरात टीव्ही लावला आहे. जगभराची माहिती मिळवण्यासाठी ते वर्तमानपत्र वाचतात.
5 / 5
मालमत्ता किती ?- 3800 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेले त्यांचे भाऊ रतन टाटा यांच्याप्रमाणेच ते साधी जीवनशैली जगतात. रतन टाटांप्रमाणे त्यांनी लग्न केले नाही. टाटा सन्स हा TCS, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा पॉवर, इंडियन हॉटेल्स आणि टाटा केमिकल्सच्या प्रमुख भागधारकांपैकी एक आहे. जिमी टाटा हे टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. त्यांच्याकडे टाटाचे शेअर्सदेखील आहेत. त्यांचे वडील नवल टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांना हे दिले आहे. सर रतनजी टाटा यांच्या पत्नी नवाझबाई यांनी नवल टाटा यांना दत्तक घेतले होते.
टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटाbusinessव्यवसाय