शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
  • एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
  • बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
  • पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान.
  • गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान
  • केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
  • Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
  • झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
  • दुपारी दीड वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी 32 टक्के मतदान
  • लातूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.२७% मतदान
  • महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी एकूण २९.४४% मतदान झालेले आहे
  • सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
  • PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
  • रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाला उत्साही सुरुवात, ११ वाजेपर्यंत २२.९३ टक्के मतदान
  • कोल्हापुरातील शिरोलीत भगवी टोपी घालण्यावरुन हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वाद
  • हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • भुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएम इति पांडेय यांनी भुसावळ येथील डी.एस. हायस्कूल केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • आमदार राजू कारेमोरे त्यांच्या पत्नी रंजिता कारेमोरे व मुलगी वैभवी व वैभव सहकुटुंब त्यांची मूळ गाव एकलारी येथील मतदान केंद्रावर मतदान करताना.
  • ठाणे जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १६.६३ टक्के मतदान
  • केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्नी मोनिका आणि कन्या सिद्धी यांच्यासमवेत कोथरूड येथील एमआयटी स्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
  • १०३ वय वर्ष असणारे स्वातंत्र्यसैनिक जी.जी. पारिख यांनी मलबार हिल मतदार संघात मतदानाचा हक्क बजावला.
  • मुलुंड म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या प्रणव पालवे (२१) या तरुणाने दोन्ही डोळ्यांनी दिसत नसतानाही पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला.
  • ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी जामनेर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • अकोला जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १६.३४ टक्के मतदान!
  • विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे येथील वागळे इस्टेट येथील एलिमेंट आयटी पार्क येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते अकरा या वेळेत 15.66% मतदान झालेले आहे.
  • दुसऱ्या सत्रात नाशिकमध्ये वाढला मतदानाचा टक्का
  • ठाणे - येणारे सरकार पूर्णपणे महायुतीचं, बहुमताचं असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मतदानानंतर प्रतिक्रिया.
  • नाशिक : जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८२ टक्के मतदान. शहरात सर्वाधिक मध्य मतदारसंघात १८.४२टक्के मतदान. जिल्ह्यात दिंडोरी मतदारसंघात २६.४१टक्के तर मालेगाव मध्यमध्ये २२.७६ टक्के मतदान.
  • रायगड जिल्हा ७ विधानसभा मतदारसंघ सकाळी ७ ते ११ या कालावधीत २०.४०% मतदान
  • कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १८.२२ टक्के मतदान झाले.
  • सकाळच्या दोन तासांत नाशिक शहरात सरासरी ६ टक्के मतदान
  • अकोल्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी मतदान केंद्राची पाहणी करीत, मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. ज्येष्ठ मतदारांशी संवाद साधला!
  • वर्सोवा विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती लव्हेकर यांनी आज सकाळी चार बंगला येथील ग्यान केंद्र शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
  • नितीन गडकरी यांनी सहपरिवारासोबत टाऊन हॉल महाल येथे मतदानाचा हक्क बजावला.
  • जळगाव : पळासखेड ता. भडगाव येथे सकाळी १०.३० वाजेपर्यंत १८००पैकी ३०जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
  • पोलीस आयुक्त मुंबई विवेक फणसळकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले व गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी कुटुंबीयांसह बजाविला मतदानाचा अधिकार.
  • विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
  • राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • नांदेड: रवी नगर भागात एक तासापासून ईव्हीएम बंद आहे, मतदार प्रतीक्षेत, दोन मशीनमध्ये झाला बिघाड, १८२ मतदान केंद्र क्रमांक
  • सोलापूर : सोलापुरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदानास प्रारंभ; बूथ प्रमुख, नेतेमंडळी व पक्षाच्या प्रमुखांसोबत कार्यकर्त्यांचे मतदान सुरू

८४ व्या वर्षी डॉक्टरेट प्रदान केलेल्या रतन टाटांकडे किती आणि कोणत्या डिग्री आहेत? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 4:51 PM

1 / 12
आताच्या घडीला जगभरात सर्वत्र बोलबाला आहे तो दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचाच. TATA ग्रुप देशातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये TATA ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सर्वाधिक विश्वासू ब्रँड म्हणूनही टाटाकडे पाहिले जाते.
2 / 12
रतन टाटा यांचा केवळ भारतात नाही, तर जगभरात दबदबा आहे. रतन टाटा यांनी अनेक रसातळाला गेलेल्या कंपन्यांना नवसंजीवनी दिल्याचे सांगितले जाते. रतन टाटा यांची जीवन प्रवास हा तितकाच रंजक आणि संघर्षमय आहे. टाटांसारख्या बड्या कुटुंबात जन्मलेल्या रतन टाटा यांना सर्व गोष्टी सहजरित्या मिळाल्या असे नाही. त्यासाठी त्यांनाही कष्ट करावे लागले.
3 / 12
नव्याने स्थापन झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या पहिल्या विशेष दीक्षांत समारोहात राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे टाटा समूहाचे अध्वर्यु रतन टाटा यांना मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान करण्यात आली.
4 / 12
रतन टाटा हे केवळ उद्योगपती किंवा कॉर्पोरेट जगताचे प्रमुखच नाहीत तर ते त्याहीपेक्षा विनम्रता, मानवता व नीतीमूल्ये जपणारे श्रेष्ठ व्यक्ती असून नव्या उद्योजकांसाठी दीपस्तंभ आहेत. रतन टाटा यांनी मानद पदवी स्वीकारून विद्यापीठाचा तसेच उपस्थितांचा गौरव वाढवला. टाटा यांचा सन्मान हा संपूर्ण टाटा समूहाचा तसेच टाटा घराण्याचा सन्मान आहे, असे गौरवौद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.
5 / 12
रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी (Ratan Tata Birth Date) झाला. इयत्ता आठवीपर्यंत रतन टाटा यांनी मुंबईतील कॅम्पियन स्कूल येथे आपले शालेय शिक्षण घेतले. यानंतर कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल आणि शिमला येथील बिशप कॉटन स्कूल येथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. (Ratan Tata Education)
6 / 12
यानंतर रतन टाटा परेदशात शिक्षणासाठी गेले. सन १९५५ मध्ये रतन टाटा यांनी न्यूयॉर्क सिटीमधील रिवरडेल कंट्री स्कूल येथून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तर १९५९ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून आर्टिटेक्चरची पदवी घेतली. हार्वर्ड बिझनेस स्कूल येथून ७ आठवड्यांचा अॅडवान्स्ड मॅनेजमेंट प्रोग्राम पूर्ण केला. यानंतर रतन टाटा यांनी मागे वळून पाहिले नाही, असे सांगितले जाते. (Ratan Tata Career)
7 / 12
सुरुवातीच्या काळात अनुभव घेण्यासाठी रतन टाटा यांनी टाटा सन्समध्ये काम करायला सुरुवात केली. विद्यार्थी जीवनात रतन टाटा यांना विमान उडवण्याचा मोठा छंद होता. एकदा संधीही मिळाली होती. मात्र, त्यावेळेस पैसे नसल्यामुळे संधी साध्य करता येत नव्हती. विमान उडवता आले पाहिजे, यासाठीच्या शिक्षणासाठी रतन टाटा यांनी अपार कष्ट सोसले.
8 / 12
अमेरिकेतील आपल्या १० वर्षांच्या विद्यार्थी जीवनातील वास्तव्यात रतन टाटा यांनी अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या. हॉटेल, रेस्टॉरंट यांसारख्या ठिकाणीही कामे केली. आज तेच रतन टाटा जगभरातील अनेक उद्योजकांपैकी आघाडीचे उद्योजक आहेत.
9 / 12
टाटा कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते. रतन टाटा यांची मेहनत आणि कठोर परिश्रम यामुळे टाटा यांचं नावलौकीक आहे. आज मेहनतीच्या जीवावरच टाटा यांच्या कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. रतन टाटा यांनी सर्वसामान्यांसाठी एक स्वप्न पाहिलं होतं. प्रत्येक माणसाला चारचाकीतून फिरता यावं यासाठी रतन टाटांनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट नॅनो ही कार भारतात सर्वात स्वस्त कार बाजारात आणली.
10 / 12
अवघ्या १ लाखात ही कार लोकांना खरेदी करता आली. रतन टाटा यांच्याकडे कार आहेत तसं फाइट जेटही आहेत. त्यांच्याकडे पायलटचं लायसन्स आहे. एकेकाळी भारतीय एअर फोर्स ए-१६ फायटर जेट त्यांनी उडवलं आहे. रतन टाटा यांच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या ताफ्यात अनेक लग्झरी कार पाहायला मिळतील.
11 / 12
रतन टाटा यांना गाड्यांचा शौक आहे. त्यांच्याकडे जगुआर, मर्सिडीज एसएल ५००, फरारी कॅलिफोर्निया, लँड रोव्हर फ्रिलँडरसारख्या महागड्या गाड्या आहेत. रतन टाटा हे सोयीसुविधा युक्त असलेल्या बंगल्यात राहतात.
12 / 12
कुलाबाच्या समुद्रकिनारी त्यांचे घर आहे. ३ मजल्याची इमारत १३ हजार फूटाची आहे. यातील पहिल्या भागात सन डेक आणि लिविंग एरिया आहे. तर बाकीच्या भागात जीम, लायब्रेरी, स्विमिंग पूल आणि लाऊज आणि स्टडी रुम आहेत. रतन टाटा यांची एकूण संपत्ती पाहिली तर नेट वर्थ डॉटनुसार १ बिलियन डॉलर इतकी आहे.
टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटाEducationशिक्षणAutomobileवाहन