शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA च्या ‘या’ कंपनीचे गुंतवणूकदार मालामाल! ४ ₹चा शेअर १२०० वर; १ लाखाचे झाले थेट २.५८ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 9:03 PM

1 / 12
गेल्या अनेक महिन्यांपासून TATA ग्रुपमधील अनेकविध कंपन्या जबरदस्त कामगिरी करत आहेत. भारतीय बाजारपेठेसह शेअर मार्केटमध्येही आपल्या कामगिरीचा आलेख चढा ठेवताना दिसत आहेत. टाटांवरील गुंतवणूकदारांचा विश्वास अनेकपटींनी वाढल्याचे दिसत आहे. यामुळेच कंपन्यांचे प्रदर्शनही उत्तम होत आहे.
2 / 12
गेल्या अनेक दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये चांगलेच चढ-उतार पाहायला मिळाले. मात्र, तरीही TATA ग्रुपच्या काही कंपन्यांनी दमदार कामगिरी करत गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले. यामुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाल्याचे सांगितले जात आहे. शेअर मार्केटमध्ये संयम महत्त्वाचा असल्याचा सल्ला दिला जातो.
3 / 12
तुम्‍ही शेअर बाजारातून करोडपती बनण्यास इच्‍छित असाल आणि TATA ग्रुपमधील कंपनीच्या शोधात असाल, तर टाटाच्या या कंपनीचा विचार करू शकता. या कंपनीने आतापर्यंत गुंतवणूकदारांना २५,७३३ टक्क्यांपेक्षा अधिकचा परतावा केल्याचे सांगितले जाते.
4 / 12
TATA ग्रुपमधील वातानुकूलित उत्पादने तयार करणाऱ्या Voltas या कंपनीची शेअर मार्केटमध्ये दमदार कामगिरी सुरू आहे. व्होल्टाज कंपनीचा शेअर ४ रुपयांवरून थेट १२०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. २२ वर्षांपूर्वी या कंपनीचा शेअर एनएसईवर ४ रुपयांवर सूचीबद्ध झाला होता.
5 / 12
गेल्या ५ वर्षांत Voltas कंपनीचा स्टॉक ३४६ रुपयांवरून १,२०९ रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना २४९.४२ टक्के परतावा दिला आहे. गेल्या २२ वर्षांत Voltas कंपनीने गुंतवणूकदारांना सुमारे २५,७३३ टक्क्यांपेक्षा अधिकचा परतावा दिला आहे.
6 / 12
जर एखाद्या गुंतवणूकदाराने २२ वर्षांपूर्वी टाटा समूहाच्या या स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर आता त्याचे १ लाख रुपयांचे २.५८ कोटी रुपये झाले असते, असे म्हटले जाते. TATA ग्रुपमधील Voltas कंपनी एक भारतीय बहुराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे, जी घरगुती उपकरणे बनवते आणि एअर कंडिशनिंग आणि कूलिंग तंत्रज्ञानामध्ये आघाडीची कंपनी आहे. Voltas कंपनीची स्थापना ६ सप्टेंबर, १९५४ रोजी मुंबईत टाटा सन्स आणि व्होल्कार्ट ब्रदर्स यांच्या सहकार्याने झाली.
7 / 12
दरम्यान, TATA ग्रुपमधील रिटेल क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या Trent कंपनीने कमाल कामगिरी केली असून, १०,७१३ टक्क्यांचा परतावा देत गुंतवणूकदारांना अतिशय मालामाल केले आहे. Trent ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग झाली, तेव्हा या कंपनीचा शेअर ९ रुपयांवर होता.
8 / 12
१ जानेवारी १९९९ रोजी Trent चा शेअर ९ रुपयांनी लिस्टिंग झाल्यानंतर हळूहळू या कंपनीने आपली यशस्वी घोडदौड काम ठेवली आणि ११ फेब्रुवारी २०२२ रोजी Trent कंपनीचा शेअर १ हजार ०६७ रुपयांवर पोहोचला आहे. ही कंपनी रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांच्या नेतृत्वात वाटचाल करत आहे.
9 / 12
१० वर्षांपूर्वी म्हणजेच १४ फेब्रुवारी २०१२ रोजी Trent कंपनीचा शेअर एनएसईवर ९४.०४ रुपयांवर होता, तोच आजच्या घडीला १,०६७.३० अंशांवर पोहोचला आहे. एकूणच प्रत्येक वर्षी या शेअरने १.२० टक्के वृद्धी साध्य केल्याचे सांगितले जाते.
10 / 12
एखाद्या गुंतवणूकदाराने २३ वर्षांपूर्वी Trent कंपनीत १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर आज त्याचाच परतावा सुमारे १.०८ कोटी रुपयांपर्यंत मिळाला असता, असे सांगितले जात आहे. तसेच १० वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने Trent कंपनीत १ लाखाची गुंतवणूक केली असेल, तर त्याला आता ११.३४ लाखांचा परतावा मिळू शकला असता, असे सांगितले जात आहे.
11 / 12
दरम्यान, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी 'खरेदी करा, होल्ड करा आणि विसरा' या धोरणाचा अवलंब करण्याशिवाय श्रीमंत होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. म्हणून, एखाद्याने दीर्घकाळ स्टॉक ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण स्टॉकमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळू शकतो.
12 / 12
TATA ग्रुपमधील टायटनचे (Tata Titan) शेअर्स हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. या शेअर्सने २३ वर्षांत ५७,००० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
टॅग्स :Tataटाटाshare marketशेअर बाजार