ration card holder will get free treatment in hospital with free ration facility modi government
Ration Card : रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 12:49 PM1 / 9Ration Card Update:रेशनकार्ड धारकांसाठी मोदी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. तुम्हीही शिधापत्रिकाधारक असाल तर आता मोफत रेशनसोबतच केंद्र आणि राज्य सरकारकडून तुम्हाला विशेष सुविधा मिळणार आहेत.2 / 9मोफत रेशनसोबतच करोडो कार्डधारकांना मोफत उपचाराची सुविधाही मिळणार आहे.3 / 9सरकारने अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या सर्व कुटुंबांसाठी आणखी एक सुविधा सुरू केली आहे. सर्व अंत्योदय कार्डधारकांच्या मोफत उपचारासाठी आयुष्मान कार्ड बनवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 4 / 9Ration Card Update: आयुष्यमान कार्डधारकांसाठी जिल्हा व तहसील स्तरावरही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत अंत्योदय कार्डधारक कुटुंबातील सर्व सदस्यांना आयुष्मान कार्ड बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.5 / 9सध्या अंत्योदय कार्डधारकांकडे आयुष्मान कार्ड उपलब्ध नाही. कार्डधारक संबंधित विभागात जाऊन त्यांची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. 6 / 9पात्र लाभार्थी कार्ड मिळाल्यानंतर, जनसेवा केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, आयुष्मान पॅनेलशी जोडलेले खासगी रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात अंत्योदय शिधापत्रिका दाखवून कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी आयुष्मान कार्ड बनवता येणार आहे.7 / 9सध्या सरकारकडून नवीन आयुष्मान कार्ड बनवले जात नाहीत. ज्या लाभार्थ्यांची नावे या योजनेत आहेत त्यांचेच कार्ड बनवले जात आहेत. 8 / 9अंत्योदय कार्डधारकांना आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास उपचारासाठी बाहेर जावे लागणार नाही, अशी शासनाची योजना आहे. यासाठी शासनस्तरावरूनही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.9 / 9दारिद्र्यरेषेखालील म्हणजेच बीपीएल कुटुंबांना अंत्योदय शिधापत्रिका दिली जाते. या कार्डद्वारे लाभार्थ्याला दर महिन्याला स्वस्त दरात खाद्यपदार्थ मिळतात. कार्डधारकांना एकूण ३५ किलो गहू व तांदूळ दिले जाते. यासाठी गहू २ रुपये किलो आणि तांदूळासाठी ३ रुपये किलो प्रमाणे पेसै द्यावे लागतात. आणखी वाचा Subscribe to Notifications