ration card link to aadhaar card you have time till 30 june 2023
Ration Card : रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! मोफत रेशन घेणाऱ्यांचा आणखी होणार फायदा, ३० जूनपर्यंत करु शकता लिंक By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 1:53 PM1 / 8 तुम्ही देखील शिधापत्रिकाधारक असाल तर ३० जून ही तारीख तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने सांगितले आहे की मोफत रेशन घेणाऱ्यांनी ३० जून ही तारीख लक्षात ठेवणे आवश्यक आहे.2 / 8अन्यथा, तुम्हाला नंतर मोफत रेशनची सुविधा मिळण्यात अडचण येऊ शकतात. आधार आणि रेशन कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.3 / 8अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शिधापत्रिका लिंक करण्याची तारीख जवळ आली आहे. 4 / 8याबाबत शासनाकडून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. रेशनकार्ड आणि आधार कार्ड लिंक केल्यानंतर गरजूंना त्यांच्या वाट्याचे धान्य मिळत आहे की नाही याची खात्री करणे सोपे होईल.5 / 8आधी रेशनला आधारशी लिंक करण्याची तारीख ३१ मार्च होती आणि नंतर ती वाढवून ३० जून करण्यात आली आणि आता तुमच्याकडे फक्त ३० दिवस उरले आहेत. 6 / 8सरकारने रेशनकार्डला वन नेशन-वन रेशन अशी घोषणा केल्यापासून रेशनकार्ड आधारशी जोडण्यावर भर दिला जात आहे.7 / 8तुमच्या राज्याच्या अधिकृत सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) पोर्टलवर जा. सक्रिय कार्डसह आधार लिंक निवडा.तुमचा रेशन कार्ड नंबर आणि नंतर आधार कार्ड नंबर टाका. तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका.8 / 8 Continue/Submit बटण निवडा. आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP मिळेल. आधार रेशन लिंक पेजवर OTP एंटर करा आणि तुमची विनंती आता सबमिट केली गेली आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला त्याबद्दल माहिती देणारा एसएमएस प्राप्त होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications