शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ravi Jaipuria : कोण आहेत कोला किंग? एका वर्षात 49 हजार कोटींची कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 12:30 PM

1 / 9
देशातील प्रसिद्ध उद्योगपती कोला किंग रवी जयपुरिया यांनी 2023 मध्ये भरपूर कमाई केली आहे. कमाईच्या बाबतीत त्यांनी उदय कोटक यांनाही मागे टाकले आहे. आरजे कॉर्पचे संस्थापक आणि चेअरमन रविकांत जयपुरिया यांच्या संपत्तीमध्ये 2023 मध्ये 6 अब्ज डॉलर इतकी वाढ झाली आहे.
2 / 9
रवी जयपुरिया यांच्या कमाईत सर्वात मोठा वाटा वरुण बेव्हरेजेसचा होता. कंपनीने 2016 मध्ये आपला IPO आणला होता. तेव्हापासून कंपनीचे शेअर्स 18 पट वाढले आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात प्रश्न आहे की, देशाचा कोला किंग कोण? तर त्यांच्याविषयी जाणून घेऊया...
3 / 9
कोला किंग रवी जयपुरिया यांनी 2023 मध्ये कमाईच्या बाबतीत देशातील सर्वात श्रीमंत बँकर उदय कोटक यांना मागे टाकले आहे. एफएमसीजी क्षेत्रात कार्यरत वरुण बेव्हरेजेसचे मार्केट कॅप या कालावधीत 163418.38 कोटी रुपये झाले आहे.
4 / 9
जर रवी जयपुरियाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्यांची एकूण संपत्ती 15.1 अब्ज डॉलर्स झाली आहे. रवी जयपुरिया हे मारवाडी आहेत. त्यांनी अमेरिकेतून बिझनेस मॅनजमेंटचे शिक्षण घेतले. 1985 मध्ये ते भारतात परतले आणि बॉटलिंगच्या कौटुंबिक व्यवसायात सामील झाले.
5 / 9
रवी जयपुरिया यांच्या कुटुंबात 1987 मध्ये वाटणी झाली. त्यामध्ये त्यांना बॉटलिंग प्लांट आला. त्यानंतर त्यांनी पेप्सिकोशी करार केला. त्यांनी दोन्ही कंपन्यांची नावे त्यांच्या मुला आणि मुलीच्या नावावर ठेवली आहेत. वरुण बेव्हरेजेस व्यतिरिक्त देवयानी इंटरनॅशनलचा देखील आरजे कॉर्पमध्ये समावेश आहे.
6 / 9
रवी जयपुरिया यांची कंपनी वरुण बेव्हरेजेस पेप्सिकोसाठी प्रोडक्शन, बॉटलिंग आणि डिस्ट्रिब्यूशनचे काम करते. हे पेप्सिकोचे अमेरिकेच्या बाहेरील दुसरे सर्वात मोठे बॉटलिंग पार्टनर आहे. तसेच, देवयानी इंटरनॅशनल भारतात केएफसी, पिझ्झा हट, कोस्टा कॉफी आणि टीडब्ल्यूजी टी आउटलेट्स चालवते.
7 / 9
रवी जयपुरिया यांची हेल्थकेअर फर्म मेदांता आणि हॉटेल चेन लेमन ट्रीमध्येही भागीदारी आहे. मार्च 2023 पर्यंत, आरजे कॉर्प लिमिटेडकडे 7 स्टॉक होते, ज्यांची एकूण संपत्ती अंदाजे 37,334.1 कोटी रुपये होती.
8 / 9
रवी जयपुरिया आपला व्यवसाय भारताबाहेर वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांच्या कंपनीने दोन मोठे आंतरराष्ट्रीय करारही केले आहेत. वरुण बेव्हरेजेसने द बेव्हरेज कंपनीचे अधिग्रहण करून दक्षिण आफ्रिकेच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.
9 / 9
कंपनीने हा करार 1,320 कोटी रुपयांना केला आहे. याशिवाय देवयानी इंटरनॅशनलही थायलंडमध्ये उतरणार आहे. कंपनीने रेस्टॉरंट्स डेव्हलपमेंट कंपनीमधील कंट्रोलिंग स्टेक खरेदी करण्यासाठी शेअर खरेदी करार केला आहे.
टॅग्स :businessव्यवसायIndiaभारत