शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

RBI च्या मंजुरीनंतर 'या' बँकांच्या क्रेडिट कार्डद्वारे होईल यूपीआय पेमेंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 11:30 AM

1 / 9
नवी दिल्ली : क्रेडिट कार्डाची यूपीआयशी जोडणी करण्याची सुविधा देण्यात येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने बुधवारी केली. त्यामुळे क्रेडिट कार्डाद्वारेही यूपीआय पेमेंट केले जाऊ शकणार आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला रुपे क्रेडिट कार्डालाच ही सुविधा दिली जाईल.
2 / 9
सध्या यूपीआय वापरकर्त्यांना केवळ डेबिट कार्ड आणि बचत तथा करंट खात्यांवरच वित्तीय व्यवहार करण्याची सुविधा मिळते. क्रेडिट कार्डांना यूपीआयशी जोडण्यासाठी एनपीसीआयला योग्य निर्देश दिले जाणार आहेत. सध्या कोणत्या बँका रुपे क्रेडिट कार्ड देत आहेत, ते जाणून घेऊया...
3 / 9
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI): रुपे क्रेडिट कार्ड ऑफर करण्यात स्टेट बँक ऑफ इंडियाचे नाव पहिल्यांदा येते. स्टेट बँक ऑफ इंडिया 'शौर्य एसबीआय रुपे कार्ड' (Shaurya SBI RuPay Card) आणि 'शौर्य सिलेक्ट एसबीआय रुपे कार्ड' (Shaurya Select SBI RuPay Card) ऑफर करत आहे.
4 / 9
पंजाब नॅशनल बँक (PNB): पंजाब नॅशनल बँक दोन रुपे क्रेडिट कार्ड देखील ऑफर करत आहे. 'पीएनबी रूपे सिलेक्ट कार्ड (PNB RuPay Select Card) आणि पीएनबी प्लॅटिनम रुपे कार्ड (PNB Platinum RuPay Card)'.
5 / 9
बँक ऑफ बडोदा (BoB): या सरकारी बँकेच्या पोर्टफोलिओमध्ये बँक ऑफ बडोदा इझी रुपे क्रेडिट कार्ड (Bank of Baroda Easy RuPay Credit Card) आणि बँक ऑफ बडोदा प्रीमियर रुपे क्रेडिट कार्ड (Bank of Baroda Premier RuPay Credit Card)अशी दोन रूपे क्रेडिट कार्ड देखील आहेत.
6 / 9
आयडीबीआय बँक (IDBI Bank): ही बँक आयडीबीआय विनिंग्स रुपे सिलेक्ट कार्ड (IDBI Winnings RuPay Select Card) ऑफर करते.
7 / 9
युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India): ही बँक युनियन प्लॅटिनम रुपे कार्ड (Union Platinum RuPay Card) आणि युनियन सिलेक्ट रुपे कार्ड (Union Select RuPay Card)ऑफर करते.
8 / 9
सारस्वत बँक (Saraswat Bank): सारस्वत बँकेचे प्लॅटिनम रुपे कार्ड (Saraswat Bank Platinum RuPay Card) आहे.
9 / 9
फेडरल बँक (Federal Bank):: फेडरल बँक रुपे सिग्नेट क्रेडिट कार्ड (Federal Bank RuPay Signet Credit Card) ऑफर करत आहे.
टॅग्स :businessव्यवसायReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकMONEYपैसा