RBI bans American Express Diners Club from on boarding new customers from 1 May
American Express सह दोन कंपन्यांवर RBI ची कारवाई; १ मेपासून नवं क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 5:14 PM1 / 10रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) डेटा पेमेंटशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोन पेमेंट सिस्टम ऑपरेटरविरोधात कठोर कारवाई केली आहे. 2 / 10रिझर्व्ह बँकेनं अमेरिकन एक्सप्रेस बँकिंग कॉर्प (American Express Banking Corp) आणि डिनर्स क्लब इंटरनॅशनल लिमिटेडला (Diners Club International Ltd) १ मेपासून भारतातल्या आपल्या कार्ड नेटवर्कमध्ये नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. तथापि, आरबीआयचा हा निर्णय या दोन कंपन्यांच्या विद्यमान ग्राहकांवर पडणार नाही.3 / 10अमेरिकन एक्सप्रेस बँकिंग कॉर्पोरेशन आणि डिनर्स क्लब इंटरनॅशनल लिमिटेड हे पेमेंट सिस्टम ऑपरेटर आहेत ज्यांना पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम अॅक्ट, २००७ (पीएसएस अॅक्ट) अंतर्गत देशातील कार्ड नेटवर्क चालवण्यास मान्यता देण्यात आली आहे.4 / 10या कायद्याच्या अंतर्गत राहूनच या कंपन्यांना देशातील ग्राहकांना क्रेडिट कार्ड जारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. २३ एप्रिल रोजी जारी केलेल्या आदेशात रिझर्व्ह बँकेनं या दोन्ही कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत. 5 / 10रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, हे दोन्ही पेमेंट ऑपरेटर पेमेंट सिस्टम डेटा साठवणुकीशी संबंधित निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले आहेत.6 / 10यामुळेच रिझर्व्ह बँकेनं हा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने ही कारवाई पीएसएस कायद्यांतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांच्या माध्यमातून केली आहे.7 / 10सुमारे तीन वर्षांपूर्वी एप्रिल २०१८ मध्ये, सर्व पेमेंट प्रदात्यांना त्यांनी ऑपरेट केलेल्या पेमेंट सिस्टमशी संबंधित सर्व डेटा सहा महिन्यांत संग्रहित करण्याचे निर्देश दिले होते आणि हा डेटा केवळ भारतातच संग्रहित करण्याचे आदेश देण्यात आले होते.8 / 10याचाच अर्थ संबंधित कंपन्यांना तो डेटा परदेशात संग्रहित करता येणार नाही असे निर्देश देण्यात आले होते. 9 / 10यामध्ये एंड टू-एंड ट्रान्झॅक्शन, जमवलेली माहिती, पेमेंट इन्स्ट्रक्शन्स इत्यादींशी संबंधित डेटा समाविष्ट होता.10 / 10या व्यतिरिक्त त्यांना रिझर्व्ह बँकेकडे अहवाल सादर करण्यास आणि सीईआरटी-इन एम्पॅनल्ड ऑडिटरद्वारे निर्धारित वेळेत मंडळाने मंजूर केलेला सिस्टम ऑडिट रिपोर्ट (एसएआर) सादर करण्यास सांगितलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications