rbi governor shaktikanta das says digital currency trial could launch till december
CBDC: डिसेंबरपर्यंत RBI आणणार स्वतःची क्रिप्टोकरन्सी!; शक्तिकांत दास यांचे संकेत By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 7:04 PM1 / 10जागतिक स्तरावरील अनेक देशांमध्ये क्रिप्टोकरन्सी म्हणजेच आभासी चलन मोठ्या प्रमाणावर रुढ होताना दिसत आहे. जागतिक स्तरावर मोठी मागणी असलेल्या क्रिप्टोकरन्सीचा पर्याय म्हणून भारतात डिजिटल करन्सी आणण्याचा विचार करण्यात येत आहे. 2 / 10भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या डिजिटल चलनावर बऱ्याच काळापासून काम करत आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत RBI आपल्या डिजिटल चलनासाठी चाचणी कार्यक्रम सुरू करू शकते. जगभरातील केंद्रीय बँका या दिशेने काम करत आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे. 3 / 10चीन, युरोप आणि यूकेची सेंट्रल बँक क्रिप्टोकरन्सीच्या व्यावसायिक आणि सार्वजनिक वापरासाठी शक्यतांवर विचार करीत आहे. आपण सीबीडीसीबद्दल खूप सावध आहोत, कारण ती पूर्णपणे नवीन संकल्पना आहे, शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले.4 / 10कोणत्याही केंद्रीय बँकेने जारी केलेल्या डिजिटल चलन किंवा क्रिप्टोकरन्सीला CBDC म्हणजेच सेंट्रल बँक डिजिटल करन्सीज असे नाव देण्यात आले आहे. या चलनाला पूर्ण कायदेशीर मान्यता असेल. सध्याच्या फिएट चलनाची ही डिजिटल आवृत्ती असेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.5 / 10डिजिटल चलनाच्या विविध पैलूंवर रिझर्व्ह बँक गांभीर्याने विचार करत असून, सर्वप्रथम प्रत्येक प्रकारे सुरक्षित असेल, यावर भर दिला जात आहे. याशिवाय त्याचा भारतीय वित्तीय व्यवस्थेवर कोणताही नकारात्मक परिणाम होऊ नये, यावर लक्ष केंद्रीत केले जात आहे. विशेषतः कोरोनानंतर अर्थव्यवस्थेवर अजूनही दबाव असून, अशा स्थितीत, सेंट्रल बँक आर्थिक बाजाराबाबत अत्यंत सावध असल्याचे सांगितले जात आहे. 6 / 10सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने बंदी हटवल्यानंतर क्रिप्टोकरन्सीसंबंधी भारतातील क्रेझ खूप वाढली आहे. ग्लोबल क्रिप्टो अॅडॉप्शन इंडेक्स २०२१ मध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे. त्याने चीन, अमेरिका, यूके आणि इंग्लंड सारख्या देशांना मागे टाकले आहे. 7 / 10जून २०२० ते जुलै २०२१ दरम्यान क्रिप्टोकरन्सीच्या स्वीकृती दरात 880 टक्के वाढ झाली आहे. सन २०१९ च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत त्यात २३०० टक्के ऐतिहासिक वाढ नोंदवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी रबी शंकर म्हणाले होते की, रिझर्व्ह बँक या वर्षाच्या अखेरीस कायदेशीर डिजिटल चलनाचे ऑपरेशनचे मॉडेल आणू शकते. 8 / 10या चलनाच्या सर्व बाबींवर तंत्रज्ञान, वितरण यंत्रणा, प्रमाणीकरण यंत्रणा यांवर काम केले जात आहे. भारत टप्प्याटप्प्याने डिजिटल चलन सुरू करण्याचा विचार करत आहे. डिजिटल चलनावर अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. तथापि, बिटकॉइन आणि इथेरियम सारख्या खाजगी क्रिप्टोकरन्सीच्या वाढत्या लोकप्रियतेने लक्ष वेधले आहे.9 / 10या सर्व क्रिप्टोकरन्सी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहेत. केंद्रीय बँकेची चिंता खाजगी क्रिप्टोकरन्सीबाबत आहे. ते अद्याप नियंत्रित केले गेले नाही आणि ही बाब सरकारच्याही लक्षात आणून दिली आहे, असेही ते म्हणाले. 10 / 10या सर्व क्रिप्टोकरन्सी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहेत. केंद्रीय बँकेची चिंता खाजगी क्रिप्टोकरन्सीबाबत आहे. ते अद्याप नियंत्रित केले गेले नाही आणि ही बाब सरकारच्याही लक्षात आणून दिली आहे, असेही ते म्हणाले. आणखी वाचा Subscribe to Notifications