RBI issue price of sovereign gold bonds rs 5051 per gram open for subscription in festive season
सणासुदीपूर्वी सरकारने आणली खास योजना, स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 10, 2020 3:12 PM1 / 13सणासुदीचा सिझन सुरू होत आहे. यापूर्वीच पुन्हा एकदा स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी मिळत आहे. मात्र, हे सोनं फिजिकल नव्हे तर बॉन्डच्या स्वरुपात असणार आहे. 2 / 13केंद्र सरकारच्या चर्चित गोल्ड बॉन्ड योजनेंतर्गत स्वस्त दरात सोने दिले जाते. सोन्याची किंमत रिझर्व बँकेकडून निश्चित केली जाते. ही किंमत बाजार मुल्याच्या तुलनेत कमी असते.3 / 13भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिलेल्या माहितीनुसार, यावेळी गोल्ड बॉन्डची किंमत 5,051 रुपये प्रति ग्रॅम एवढी निश्चित करण्यात आली आहे. 4 / 13गोल्ड बॉन्डसाठी ऑनलाईन अर्ज आणि डिजिटल पद्धतीने पैसे जमा करणाऱ्यांसाठी प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट मिळणार आहे.5 / 13अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बॉन्डची किंमत 5,001 रुपये प्रति ग्रॅम एवढी असेल.6 / 13गोल्ड बॉन्ड योजनेंतर्गत सोनं विकत घेण्याची ही योजना 12 ते 16 ऑक्टोबरपर्यंत असेल.7 / 13हे सोने बॉन्डच्या स्वरुपात दिले जाते. अर्थात आपल्याला ज्वेलरीप्रमाणे या सोन्याचा वापर करता येत नाही. 8 / 13याला गुंतवणुकीसाठी प्राथमिकता दिली जाते. या योजनेचा मॅच्यूरिटी कालावधी आठ वर्ष एवढा आहे. पाच वर्षानंतर यातून बाहेर पडण्याचाही पर्याय आहे. 9 / 13गोल्ड बॉन्डमध्ये किमान एक ग्रॅम सोन्याची गुंतवणूक केली जाऊ शकते. तसेच सामान्य नागरिकांसाठी यात अधिकांश गुंतवणुकीची मर्यादा चार किलो सोने आहे.10 / 13हे सोने विकत घेण्यासाठी आपल्याला आपली बँक, बीएसई, एनएसईच्या वेबसाईट अथवा पोस्ट ऑफीसशी संपर्क साधावा लागेल.11 / 13येथून गोल्ड बॉन्ड डिजिटलपद्धतीने विकत घेतले जाऊ शकतात. ही एक प्रकारची अत्यंत सुरक्षित गुंतवणूक आहे. कारण यात सोन्याच्या शुद्धतेची आणि सुरक्षिततेचीही चिंता नसते.12 / 13यावेळी, सोन्याची खरेदी टळल्यास तुम्हाला नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल. ही योजना 9 नोव्हेंबरपासून 13 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा एकदा खुली होईल. 13 / 13ही योजना सुरू करण्यामागचा सरकारचा हेतू, आयात आणि फिजिकल सोन्याची मागणी कमी करणे असा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications