शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

RBI New Rules: एक ऑगस्टपासून बँकांशी संबंधित नियम बदलणार; ATM मधून पैसे काढणंही महागणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 2:15 PM

1 / 8
ऑगस्ट महिन्यापासून बँकांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. बँकिंगसंबंधीच्या दैनंदीन कामांवर तर याचा परिणाम होईलच. पण, इतर क्षेत्रांवरही याचा मोठा प्रभाव पडेल. बँकांसोबत व्यवहार करणाऱ्या लोकांना 1 ऑगस्टपासून बदलणाऱ्या या नियमांसंदर्भात माहिती होणे आवश्यक आहे. एक ऑगस्टपासून बँकिंगशी संबंधित अनेक शुल्कांमध्ये वाढ होणार आहे. (RBI new rules about salary EMI payments to ATM charges rules which are changing from august month )
2 / 8
भारतीय रिझर्व्ह बँकेने जून महिन्यात घोषणा केली होती, की राष्ट्रीय स्वयंचलित क्लिअरिंग हाऊस (एनएसीएच) 1 ऑगस्ट 2021 पासून आठवड्याच्या सर्व दिवस उपलब्ध असेल.
3 / 8
एनएसीएच, एक बल्क पेमेंट सिस्टिम आहे, जी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) द्वारे चालविली जाते. यामुळे एकापेक्षा अधिक क्रेडिट ट्रांसफरची सुविधा मिळते. जसे, की लाभांश, व्याज, वेतन आणि पेन्शनचे देणे. याद्वारे, वीज, गॅस, टेलीफोन, पानी, कर्जासाठी ठराविक हप्ते, म्युच्युअल फंडात गुंतवणूक आणि विमा प्रिमियमशी संबंधित पेमेंट्स संकलन करण्याची सुविधाही मिळते.
4 / 8
एटीएममधून पैसे काढणे महागणार - जून महिन्यात आरबीआयने म्हटले होते, की एटीएमवर व्यवहारासाठीचे इंटरचेन्ज शुल्क 15 रुपयांवरून वाढवून 17 रुपये करण्यात आले आहे. आरबीआयने घोषित केलेली वाढ 1 ऑगस्टपासून लागू होईल.
5 / 8
एटीएम मधील स्वच्छता आणि सुविधा यांवर होणारा खर्च लक्षात घेत नऊ वर्षांनंतर इंटरचेन्ज शुल्कात वाढ करण्यात आली आहे. जे बँकांना द्यावे लागते. गैर-आर्थिक व्यवहारासाठी शुल्क 5 रुपये ते 6 रुपये वाढविण्यात आले आहे.
6 / 8
आयपीपीबीद्वारे बँकिंग शुल्कामध्ये सुधारणा - इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी)ने घोषणा केली होती, की जे ग्राहक याच्या डोरस्टेप सेवांचा वापर करतील, त्यांना आता अधिकचे शुल्क द्यावे लागणार आहे.
7 / 8
आयपीपीबीने म्हटले आहे, की ते डोरस्टेप सेवांसाठी प्रत्येक विनंतीला 20 रुपये (प्लस जीएसटी) आकारणे सुरू करणार आहेत. हे 1 ऑगस्टपासून सुरू होईल. सध्या आयपीपीबीद्वारे दिल्या जाणाऱ्या डोरस्टेप बँकिंगवर कुठल्याही प्रकारचे शुल्क नाही.
8 / 8
याच बरोबर आयपीपीबी कर्मचारी एखाद्या ग्राहकाच्या घरी सेवेसाठी गेल्यास व्यवहाराच्या संख्येला कुठल्याही प्रकारची मर्यादा असणार नाही.
टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँकatmएटीएमBanking Sectorबँकिंग क्षेत्र