शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mobikwik डेटा लिक प्रकरणी RBI चे तपासाचे आदेश; केस सिद्ध झाल्यास लागू शकतो 'इतका' दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 9:23 AM

1 / 20
फिनटेक स्टार्टअप mobikwik च्या ९.९ दशलक्ष भारतीय युझर्सचा डेटा चोरल्याचा दावा हॅकर्सनी केला होता. यामध्ये या लोकांचे मोबाईल क्रमांक, बँक खात्याचा तपशील, ईमेल आणि क्रेडिट कार्ड नंबर यांचा समावेश आहे.
2 / 20
परंतु कंपनीनं याचं खंडन केलं होतं. या डेटा हॅकिंगचा खुलासा सायबर सुरक्षा विश्लेषक राजशेखर रजहरिया यांनी केला होता.
3 / 20
दरम्यान, या प्रकरणी आता भारतीय रिझर्व्ह बँकेनं तपासाचे आदेश दिले आहेत. तसंच यात कंपीनीची कोणतीही चूक आढळून आल्यास कंपनीकडून दंड आकारला जाणार असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला.
4 / 20
याबाबात रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांकडून माहिती देण्यात आली. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
5 / 20
मोबिक्विक या कंपनीमध्ये अमेरिकेची कंपनी Sequoia Capital आणि भारतीय कंपनी बजाज फायनॅन्स यांचीही भागीदारी आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात डेटा लिक झाल्याचा दावा तज्ज्ञानं केला होता. परंतु त्यानंतर कंपनीनं याचं खंडन केलं होतं. यानंतर याप्रकरणी मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली होती.
6 / 20
रिझर्व्ह बँकेला अशा प्रकरणांमध्ये कोणत्याही पेमेंट सिस्टमवर किमान ५ लाख रूपयांपर्यंत दंड आकारण्याचे अधिकार आहेत.
7 / 20
कंपनीनं सुरूवातीला दिलेल्या प्रतिक्रियेवरून रिझर्व्ह बँक सहमत नसल्याचं म्हटलं जात आहे. तसंच कंपनीला यावर लवकरात लवकर पावलं उचलण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
8 / 20
दरम्यान, यापूर्वी कंपनीला टीकेचाही सामना करावा लागला होता ज्यावेळी डेटा लिक बाबत सर्वप्रथम माहिती देणाऱ्या सिक्युरिटी रिसर्चरच्याविरोधात कायदेशीर कारवाईची धमकी दिली होती.
9 / 20
या आठवड्यात काही युझर्सनं त्यांच्या क्रेडिट कार्ड सारख्या महत्त्वाची माहिती एका लिक्ड ऑनलाईन डेटाबेसमध्ये दिसत असून ती कथितरित्या मोबिक्विकशी जोडलेली असल्याची तक्रार काही युझर्सनं केली होती.
10 / 20
रिझर्व्ह बँकेनं मोबिक्विकला इशारा दिला आहे आणि आदेश दिला की याच्या फॉरेन्सिक ऑडिटसाठी एका एक्स्टर्नल ऑडिटरला नेमलं जाणार असल्याचं सांगितलं.
11 / 20
जर लिकबद्दल माहिती निश्चित झाली तर रिझर्व्ह बँक कंपनीला दंड ठोठावू शकतं असंही सूत्रांकडून सांगण्यात आलं.
12 / 20
आपण आपल्या युझर्सच्या माहितीच्या सुरक्षेला प्राधान्य देत असल्य़ाचं कंपनीनं यापूर्वीच नमूद केलं होतं. सध्या कंपनीकडे १२ कोटी ग्राहक आहेत.
13 / 20
भारतीय बाजारात मोबिक्विकची पेटीएम आणि गुगल पे सारख्या कंपन्यांशी स्पर्धा आहे.
14 / 20
यापूर्वी या लिकबद्दल राजहरिया यांनी भारतीय रिझर्व्ह बँक, इंडियन कंम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम, पीसीआय मानके आणि पेमेंट टेक्नॉलॉजी कंपन्यांनाही याबाबत लेखी स्वरूपात याची माहिती दिली होती.
15 / 20
आपला हेतू केवळ कंपनीकडून पैसे घेण्याचा असल्याचं या जॉर्डन डेवेन या हॅकिंग समूहानं म्हटलं होचं. पैसे मिळाल्यानंतर हा डेटा डिलीट केला जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
16 / 20
मोबिक्विकनं मात्र या लिकच्या दाव्याला नकार दिला होता. कंपनी ग्राहकांच्या डेटाबाबत अधिक गंभीर आहे आणि सुरक्षा कायद्यांचं पूर्णपणे पालन करतं, असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
17 / 20
दरम्यान हॅकर समूहानं हा टेडा मोबिक्विकचा असल्याचा दावा केला होता. तसंच या ग्रुपने मोबिक्विक क्यूआर कोडची बरीच छायाचित्रे व ग्राहकांना जाणून घेण्यासाठी त्यांची कागदपत्रे आधार आणि पॅनकार्डसह अपलोड केली होती.
18 / 20
यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत काम करत असल्याचं मोबिक्विकनं स्पष्ट केलं होतं. तसंच या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता तिसऱ्या पक्षामार्फत फॉरेन्सिक डेटा सिक्युरिटी ऑडिट करणार असल्याचंही कंपनीनं सांगितलं होतं.
19 / 20
मोबिक्विकची सर्व खाती आणि त्यातील रक्कम पूर्णपणे सुरक्षित असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.
20 / 20
जर तुम्हाला तुमचा अकाऊंट हँक झाल्याची शंका असेल तर https://cybernews.com/personal-data-leak-check/ यावर क्लिक करावं लागेल. यावर तुम्ही तुमचा ईमेल आयडी टाकून तुमची माहिती लीक झाली आहे किंवा नाही हे पाहू शकता.
टॅग्स :MobiKwikमोबिक्विकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकonlineऑनलाइनMONEYपैसा