RBI sovereign gold bond scheme opens from august 31
खूशखबर! : स्वस्तात सोनं विकत घेण्याची संधी! पुन्हा सुरू होतेय मोदी सरकारची 'ही' खास योजना By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 1:42 PM1 / 10गेल्या काही वर्षांपासून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार फिजिकल सोन्याची मागणी कमी करण्यासाठी एक खास योजना चालवत आहे. या योजनेला 'सुवर्ण बॉन्ड योजना', असे नाव देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत केंद्रातील मोदी सरकार पुन्हा एकदा सोने विकत आहे.2 / 10सरकार बॉन्डच्या स्वरुपात सोन्याची विक्री करत असते. या सोन्याची किंमत रिझर्व्ह बँकेकडून निश्चित केली जाते. रिझर्व्ह बँक वेळोवेळी या सोन्याची किंमत जारी करत असते. 3 / 10ही किंमत बाजारातील फिजिकल सोन्याच्या तुलनेत कमी आणि सुरक्षित असते. तर जाऊन घेऊया या योजनेंतर्गत मिळणाऱ्या सोन्याच्या नव्या किमती विषयी. 4 / 10रिझर्व्ह बँकेने यावेळी सुवर्ण बॉन्डची किंमत 5,117 रुपये प्रति ग्रॅम एवढी ठेवली आहे. 5 / 10सुवर्ण बॉन्डच्या खरेदीसाठी डिजिटल पद्धतीने पैसे जमा केल्यास प्रति ग्रॅम 50 रुपयांची सुटही मिळणार आहे. अशा गुंतवणूकदारांच्या बॉन्डची किंमत 5,067 रुपये प्रति ग्रॅम एवढी असेल. 6 / 10ही योजना 31 ऑगस्टला सुरू होऊन 4 सप्टेंबरला बंद होईल. याचाच अर्थ आपण या दरम्यान सोन्याची खरेदी करू शकता. या योजनेत कमीतकमी एक ग्रॅम सोने विकत घेता येऊ शकते. 7 / 10हे सोने विकत घेण्यासाठी आपल्याला आपल्या बँक, बीएसई, एनएसईची वेबसाईट अथवा पोस्ट ऑफीसशी संपर्क साधावा लागेल... 8 / 10...येथून सुवर्ण बॉन्ड डिजिटलपद्धतीने विकत घेतले जाऊ शकतात. ही एक प्रकारची अत्यंत सुरक्षित गुंतवणूक आहे. कारण यात सोन्याच्या शुद्धतेची आणि सुरक्षिततेचीही चिंता नसते.9 / 10आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये रिझर्व्ह बँकेने दहा हप्त्यांत एकूण 2,316.37 कोटी रुपये अर्थात 6.13 टनांचे सुवर्ण बॉन्ड जारी केले आहेत. तसेच कोरोना काळात गेल्या 6 महिन्यांपासून बॉन्ड जारी करण्यात येत आहे.10 / 10सांगण्याचा हेतू असा, की यावेळी गुंतवणूक टळल्यास आपल्याला आणकी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल. ही योजना सुरू करण्यामागचा सरकारचा हेतू, आयात आणि फिजिकल सोन्याची मागणी कमी करणे असा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications