rbi strong arm tactics employed by bank recovery agents know detail here
कर्ज वसुलीसाठी रिकव्हरी एजंट शिवीगाळ, धमकी देत असेल तर घाबरु नका, RBI चा नवा आदेश वाचा... By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 7:00 PM1 / 8आपली काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर काहींना नामुष्की ओढावल्यामुळे बँकेकडून कर्ज घ्यावं लागतं. कर्जाची परतफेड करताना काही आर्थिक अडचणींमुळे काहीवेळा अशी परिस्थिती निर्माण होते की हप्ता भरता येत नाही. त्यामुळे बँकांचे कर्ज वसुली एजंट वसुलीसाठी कर्जदारांना त्रास देऊ लागतात. काही वेळा शिवीगाळ आणि हाणामारीवरही उतरतात. पण आता असं होऊ शकत नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नियम कडक केले आहेत. 2 / 8आरबीआयने स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांच्या नियामक कार्यक्षेत्रातील सर्व संस्थांना हे सुनिश्चित करावे लागेल की रिकव्हरी एजंट कर्जदारांना त्रास देणार नाहीत. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नुकतंच सांगितलं की कर्ज वसुली एजंट लोकांशी गैरवर्तन करतात, जे पूर्णपणे चुकीचं आहे. 3 / 8आरबीआयने आपल्या वेबसाइटवर जारी केलेल्या अधिसूचनेतील नमूद माहितीनुसार रिकव्हरी एजंट्सच्या गैरकृत्यांबद्दल रिझर्व्ह बँक चिंतेत आहे. नियामक संस्थाचे प्रतिनिधी किंवा त्यांचे रिकव्हरी एजंट कर्जाची वसुली करताना कोणत्याही प्रकारची धमकी देणार नाहीत हे प्रत्येक संस्थेनं सुनिश्चित करावं असं आरबीआयनं म्हटलं आहे. कोणत्याही कर्जदाराशी गैरवर्तन किंवा हाणामारी होऊ नये. 4 / 8मध्यवर्ती बँकेने असेही म्हटले आहे की बँका, बिगर बँका आणि इतर नियमन केलेल्या संस्थांना हे सुनिश्चित करावे लागेल की त्यांच्या वसुली एजंटांनी कर्जदाराचे मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांसह सार्वजनिकपणे गैरवर्तन करू नये किंवा त्यांच्या गोपनीयतेत घुसखोरी करू नये. कर्जदारांनी मोबाईल किंवा सोशल मीडियाद्वारे भीतीदायक संदेश पाठवू नये किंवा असे कॉल करू नये.5 / 8वसुली एजंट्सनी कर्जदाराला वारंवार कॉल करू नयेत. कर्जवसुलीबाबत कर्जदारांना सकाळी ८ वाजण्यापूर्वी आणि सायंकाळी ७ नंतर बोलावू नये, असा नियम आरबीआयनं घालून दिला आहे. तसंच कोणत्याही नियमन केलेल्या संस्थेने याचे उल्लंघन केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल असंही स्पष्ट केलं आहे. 6 / 8आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी जूनमध्ये एका परिषदेत सांगितले की, कर्ज वसुली एजंट कर्जदारांना कधीही कॉल करतात आणि त्यांच्याशी गैरवर्तन करतात. हे अजिबात मान्य नाही. सेंट्रल बँक हे गांभीर्याने घेत आहे आणि कठोर पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही.7 / 8कर्जवसुली संदर्भात आरबीआयची मार्गदर्शक तत्त्वे आधीच आहेत. त्यानुसार कर्ज वसुलीसाठी शाररिक शक्तीचा वापर करणे किंवा धमकावणे हे छळवणुकीच्या कक्षेत येतं. जर कोणताही रिकव्हरी एजंट तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही विलंब न करता रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करू शकता. तसंच, कर्जवसुली एजंटच्या अपमानास्पद वागणुकीचा विरोध करण्यासाठी कर्जदारांकडे कायदेशीर मार्ग आहेत.8 / 8आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कर्ज वसूली एजंट कर्जाच्या वसुलीसाठी धमक्या किंवा छळ करू शकत नाहीत. यामध्ये शाब्दिक किंवा शारिरीक छळ दोन्हीचा समावेश आहे. कर्जदाराला वारंवार कॉल करणे हे देखील त्रास देण्याच्या श्रेणीत येते. एवढेच नव्हे तर कर्जदाराचे घर किंवा कामाच्या ठिकाणी न कळवता नातेवाईक, मित्र किंवा सहकारी कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि त्रास देणे हाही छळ आहे. धमक्या किंवा अपशब्द वापरणे देखील त्याच्या कक्षेत येते. आणखी वाचा Subscribe to Notifications