refex industries rs 2 share gave 33000 percent return, rs 1 lakh became rs 3.3 crore
याला म्हणतात धमाका! ₹2 च्या शेअरनं दिला 33000% परतावा, ₹1 लाखाचे झाले ₹3.3 कोटी By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 10:09 PM1 / 8रेफ्रिजरंट गॅस (Refrigerant gas) तयार करणारी कंपनी रेफेक्स इंडस्ट्रीजच्या (Refex Industries) शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षांत मल्टीबॅगर परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर 2 रुपयांवरून 670 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 2 / 8या कालावधीत रेफेक्स इंडस्ट्रीजचा शेअर तब्बल 33000 टक्यांहून अधिक वधारला आहे. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 923.95 रुपये एवढा आहे. तर नीचांक 141.65 रुपये एवढा आहे.3 / 833847 टक्क्यांचा दिला परतावा - रेफेक्स इंडस्ट्रीजचा शेअर 29 ऑगस्ट 2013 रोजी बीएसईवर 2 रुपयांवर होता. तो 8 सप्टेंबर 2023 रोजी बीएसईवर 678.95 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरने तब्बल 33847 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 4 / 81 लाखाचे झाले 3 कोटी - जर एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांपूर्वी रेफेक्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता या शेअर्सचे मूल्य 3.39 कोटी रुपये झाले असते.5 / 85 वर्षांत 3900 टक्क्यांची तेजी - रेफेक्स इंडस्ट्रीजचा शेअर 14 सप्टेंबर 2018 रोजी बीएसईवर 16.81 रुपयांवर होता. तो 8 सप्टेंबर 2023 रोजी 678.95 रुपयांवर बंद झाला. अर्थात या शेअरने गेल्या 5 वर्षांत 3938 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 6 / 8जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी रेफेक्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आजपर्यंत कायम ठेवली असती, तर आता त्याच्या शेअर्सचे मूल्य 40.38 लाख रुपये झाली असती. तर गेल्या एका वर्षांत या शेअरने तब्बल 363 टक्क्यांचा परतावा दिला आहे.7 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications