rekha jhunjhunwala portfolio earn 692 crore rupees from tata group share titan
जबरदस्त! TATA च्या 'या' शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल, एका महिन्यात ६९२ कोटींची केली कमाई By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 5:11 PM1 / 9दिवंगत गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्टॉक्स आहेत जे उत्तम परतावा देत आहेत. असाच एक स्टॉक टाटा समूहाच्या टायटनचा आहे.2 / 9असाच एक स्टॉक TATA समूहाच्या टायटनचा आहे. या शेअरमध्ये झालेल्या वाढीमुळे रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत एका महिन्यात जबरदस्त झेप घेतली आहे.3 / 9रेखा झुनझुनवाला यांच्याकडे LIC समर्थित टायटनमध्ये ५.१७ टक्के हिस्सा किंवा ४,५८,९५,९७० शेअर्स आहेत.4 / 9टायटनच्या शेअरची किंमत एका महिन्यात प्रति शेअर २३९७.१० वरून २५४८ प्रति शेअर झाली आहे. यावेळी किंमत प्रति शेअर १५०.९० ने वाढली आहे. 5 / 9डिसेंबर २०२२ च्या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्न पाहता रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे ४,५८,९५,९७० शेअर्स आहेत. टायटनच्या शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत गेल्या एका महिन्यात अंदाजे ६,९२,५७,०१,८७३ अंदाजे ६९२ कोटींची वाढ झाली आहे.6 / 9डिसेंबर तिमाहीपर्यंतच्या आकडेवारीनुसार LIC ने टायटनमध्ये गुंतवणूक केली आहे. LIC कडे टायटन कंपनीचे २,०५,१९,६९९ शेअर्स आहेत.7 / 9टाटा समूहाच्या कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या २.३१ टक्के आहे. एलआयसीकडे सप्टेंबर तिमाहीत टायटनचे २,८९,६३,५९६ शेअर्स होते, जे कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या ३.२६ टक्के होते. एलआयसीने तिसर्या तिमाहीत टाटा समूहाच्या कंपनीतील आपली हिस्सेदारी कमी केली आहे.8 / 9SBI निफ्टी 50 ETF ने देखील Titan मध्ये गुंतवणूक केली आहे. डिसेंबर तिमाहीपर्यंत, SBI निफ्टी 50 ETF कडे टायटनचे १,४०,०५,६९३ शेअर्स होते.9 / 9 म्हणजेच कंपनीतील १.५८ टक्के हिस्सा होता. जानेवारी ते मार्च २०२३ तिमाहीचे आकडे अजून आलेले नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications