शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३०० रुपये होती सॅलरी तरी, ५ स्टार हॉटेलमध्ये चहा प्यायचे धीरुभाई अंबानी; हे होतं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 12:46 PM

1 / 5
धीरुभाई अंबानी यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड या छोट्या गावात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव हिरालाल अंबानी आणि आईचं जमनाबेन होतं. धीरुभाई अंबानी यांचे वडील शिक्षक होते. दोन खोल्यांच्या घरात संपूर्ण कुटुंब राहत होतं.
2 / 5
धीरुभाई अंबानींना यांनी वडिलांच्या सांगण्यावरून नोकरी करण्यास सुरुवात केली. ते आपल्या मोठ्या भावाकडे येमेनला गेले. तिथल्या पेट्रोल पंपावर त्यांना नोकरी मिळाली. त्यांचा पहिला पगार ३०० रुपये होता, पण काही महिन्यातच पेट्रोल पंपाच्या मालकानं त्यांना मॅनेजर बनवलं.
3 / 5
धीरूभाई ज्या कंपनीत काम करत होते, त्या कंपनीच्या कॅन्टीनमध्ये धीरूभाईंना २५ पैशांना चहा मिळत असे, पण तिथे चहा पिण्याऐवजी धीरूभाई अंबानी जवळच्याच महागड्या हॉटेलमध्ये जात. तिथे त्याला एका कप चहासाठी १ रुपया मोजावा लागत होता.
4 / 5
मोठे व्यापारी, उद्योगपती महागड्या हॉटेल्समध्ये येतात. ते तिथं व्यवसायाबद्दल चर्चा करतात. व्यवसायातील बारकावे समजावेत म्हणून मी त्यांचं ऐकायला जायचो असं त्यांनी याबाबत विचारलं असता सांगितलं होतं.
5 / 5
यावरून धीरुभाई अंबानींच्या मनात व्यवसाय करण्याबाबत किती इच्छा होती हे दिसून येतं. त्यांच्या या इच्छाशक्तीमुळेच त्यांनी यशाचं शिखर गाठलं. यानंतर धीरुभाई अंबानी भारतात परतले आणि ५०० ​​रुपये घेऊन मुंबई गाठलं. त्यांनी आपल्या चुलत भावासह या ठिकाणी रिलायन्सची सुरुवात केली.
टॅग्स :Dhirubhai Ambaniधीरुभाई अंबानीRelianceरिलायन्स