शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Reliance Industries नं Strand Life Sciences मध्ये खरेदी केला ५७ टक्के हिस्सा; ३९३ कोटींना व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 5:48 PM

1 / 9
रिलायन्स इंडस्ट्रीजची (Reliance Industries) उपकंपनी असलेल्या रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्सने (RSBVL) Strand Life Sciences 57.06 टक्के भागभांडवल 393 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
2 / 9
कंपनी मार्च 2023 पर्यंत त्यात आपला हिस्सा आणखी वाढवेल. यासाठी ती 160 कोटी रुपये खर्च करेल. अशाप्रकारे, रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स यामध्ये एकूण 553 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. यानंतर, Strand Life Sciences मधील रिलायन्सचा हिस्सा 80.3 टक्के होईल.
3 / 9
रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेडने स्ट्रँड लाइफ सायन्सेसचे 2.28 कोटी इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. अशाप्रकारे त्यात त्याचा वाटा वाढून 57 टक्के झाला. डिजिटल हेल्थकेअर क्षेत्रात रिलायन्सचा प्रवेश वाढवण्याच्या हेतूनं कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी केल्याचं सांगण्यात येत आहे.
4 / 9
स्ट्रँड लाइफ सायन्सेसची सुरुवात 2000 मध्ये झाली. ही कंपनी जीनोम टेस्टिंग, बायोइन्फॉर्मेटिक्स सॉफ्टवेअरमध्ये व्यवसाय करते. हे दवाखाने, रुग्णालये, वैद्यकीय उपकरणे उत्पादक आणि औषध कंपन्यांना देखील आपली सेवा प्रदान करते.
5 / 9
2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीला 8.48 कोटींचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीची उलाढाल 88.70 कोटी रुपये होती.
6 / 9
रिलायन्सने स्ट्रँड लाइफ सायन्सेसची खरेदी करणे हे कंपनीच्या डिजिटल हेल्थ इनिशिएटीव्हमध्ये उपक्रम वाढवण्याच्या धोरणाचा एक भाग आहे. कंपनीने Netmeds,Karexpert Qj c-Square हिस्सा खरेदी केला आहे.
7 / 9
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रिलायन्सने ऑनलाइन फार्मसी नेटमेड्समध्ये 60 टक्के हिस्सा 620 कोटी रुपयांना खरेदी केला होता. कंपनीला ई-फार्मसीमध्ये प्रवेश करायचा आहे आणि ई-फार्मसीमध्ये रिलायन्स रिटेलची उपस्थिती वाढवायचा आहे.
8 / 9
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत रिलायन्स 114 फार्मसी चालवत होती. यासह, त्याने बेंगळुरूमध्ये हायपर लोकल डिलिव्हरीचा पायलट प्रोजेक्ट देखील सुरू केला आहे.
9 / 9
डिजिटल हेल्थकेअरमध्ये आपली उपस्थिती वाढवण्यासाठी कंपनी डोअर टू डोअर मार्केटिंग देखील करत आहे. यासोबतच आरोग्य शिबिरेही आयोजित केली जात आहेत. कंपनी जलद वितरणावर भर देत आहे, जेणेकरून ती बाजारातील स्पर्धकांशी स्पर्धा करू शकेल.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीRelianceरिलायन्सHealthआरोग्यInvestmentगुंतवणूक