शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mukesh Ambani Reliance: मुकेश अंबानींनी दिले निवृत्तीचे संकेत; रिलायन्समध्ये मोठे फेरबदल, उत्तराधिकारी कोण होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 10:46 AM

1 / 12
जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टॉप १० मध्ये प्रवेश करणारे दिग्गज भारतीय उद्योगपती म्हणजे मुकेश अंबानी. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजचा डंका जगभरात वाजताना पाहायला मिळत आहे.
2 / 12
कोरोना संकट काळातही रिलायन्सच्या अनेक कंपन्यांनी दमदार कामगिरी करत गुंतवणूकदारांना मालामाल केले. मार्केट कॅपमध्येही रिलायन्स आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, आताच्या घडीला अनेकविध क्षेत्रात आपला व्यवसाय पसरवत असताना मुकेश अंबानी यांनी निवृत्तीचे संकेत दिल्याचे सांगितले जात आहे.
3 / 12
अचानक मुकेश अंबानी निवृत्तीची भाषा करू लागल्याने अवघ्या उद्योग जगताच्या भुवया उंचावल्या आहेत. देशातल्या बलाढ्य अशा रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये नेतृत्वबदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचे स्पष्ट संकेत RILचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी दिले.
4 / 12
धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कंपनीच्या फॅमिली डे कार्यक्रमात त्यांनी निवृत्तीची भाषा केली आणि आम्ही फक्त त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. सक्षम केले पाहिजे. प्रोत्साहन दिले पाहिले.
5 / 12
आमच्यापेक्षा जास्त यश मिळवल्यामुळे शांत बसून टाळ्या वाजवल्या पाहिजेत, असा स्पष्ट उल्लेख केला. त्यामुळे आता रिलायन्सचा उत्तराधिकारी म्हणून पुढे कोण येणार, याची उद्योग जगतात चर्चा सुरू झाली आहे.
6 / 12
मुकेश अंबानी आता ६४ वर्षांचे आहेत. सन २००२ मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी RILचे अध्यक्ष झाले. तिथून त्यांनी केलेली प्रगती साऱ्या देशाने पाहिली. त्यांना आकाश, ईशा आणि अनंत अशी तीन मुले आहेत.
7 / 12
मुकेश अंबानी यांची तीनही मुले RILच्या दूरसंचार, किरकोळ आणि ऊर्जा व्यवसायाचे काम पाहतात. मात्र, यापैकी RILच्या संचालक मंडळावर कोणीही नाही. ते कंपनीच्या प्रमुख शाखांमध्ये संचालक म्हणून काम पाहतात.
8 / 12
मुकेश अंबानी म्हणाले की, आम्ही फक्त त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. सक्षम केले पाहिजे. प्रोत्साहन दिले पाहिले. त्यांनी आमच्यापेक्षा जास्त यश मिळवल्यामुळे शांत बसून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. मला यात शंका नाही की, आकाश, ईशा आणि अनंत हे पुढच्या पिढीचे नेतृत्व म्हणून रिलायन्सला आणखी उंच अशा यशाच्या शिखरावर नेतील.
9 / 12
रिलायन्सप्रती त्यांची उत्कटता, वचनबद्धता आणि निष्ठा दररोज पाहू आणि अनुभवू शकतो. लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आणि भारताच्या विकासात योगदान देण्यासाठी माझ्या वडिलांची तीच ठिणगी आणि क्षमता मला त्यांच्यामध्ये दिसते, असे कौतुकही मुकेश अंबानी यांनी यावेळी बोलताना केले.
10 / 12
मोठ्या संधीचा फायदा घेऊन RIL च्या भविष्यातील वाढीचा पाया घालण्याची वेळ आली आहे. कापड कंपनी म्हणून सुरू झालेली RIL विविध व्यावसायिक हितसंबंध असलेल्या समूहात रूपांतरित झाली आहे. ज्यांची उत्पादने दररोज लोकांच्या जीवनाला स्पर्श करतात. आम्ही आमचा ऊर्जा व्यवसाय पूर्णपणे री-इंजिनियर केला आहे.
11 / 12
आता, रिलायन्स स्वच्छ आणि हरित ऊर्जा आणि सामग्रीमध्ये जागतिक आघाडीवर आहे. आमच्या जुन्या व्यवसायाचे हे परिवर्तन आम्हाला रिलायन्ससाठी सर्वात मोठे ग्रोथ इंजिन ठरेल, असा आशावादही मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला.
12 / 12
दरम्यान, सूचीबद्ध कंपन्यांमधील अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदे विभाजित करण्यासाठी सेबीने मुदतवाढ दिली आहे. आता मुकेश अंबानी या संधीचा फायदा घेऊ इच्छितात, असे सांगितले जात आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, मुकेश अंबानी जगभरातील टॉप १० श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील झाले असून, त्यांचे नेटवर्थ ८५ अब्ज डॉलर आहे.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीRelianceरिलायन्स