शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Reliance Industries: मुकेश अंबानींची शॅापिंग; एकाचवेळी खरेदी केल्या दोन कंपनी, 'इतक्या' कोटींमध्ये झाला करार...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 2:44 PM

1 / 7
Mukesh Ambani: आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​(RIL) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) सातत्याने आपला व्यवसायात वाढ करत आहेत. अलीकडेच त्यांनी अमेरिकन कंपनी Senshawk आणि सॉफ्ट ड्रिंक ब्रँड कॅम्पा कोलाच्या डीलनंतर आणखी दोन कंपन्या विकत घेतल्या आहेत. रिलायन्सने पॉलिस्टर चिप आणि धागा बनवणारी कंपनी शुभलक्ष्मी पॉलिस्टर्स आपल्या नावे केली आहे.
2 / 7
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शेअर बाजाराला या डीलबाबत माहिती दिली आहे. RILच्या मालकीची उपकंपनी असलेल्या रिलायन्स पेट्रोलियम रिटेल लिमिटेड (पूर्वी रिलायन्स पॉलिस्टर लिमिटेड) ने शुभलक्ष्मी पॉलिस्टर्स लिमिटेड (SPL) आणि शुभलक्ष्मी पॉलिटेक्स लिमिटेड (SPTex) यांचा पॉलिस्टर व्यवसाय ताब्यात घेतला आहे. या अंतर्गत, एसपीएलसाठी 1522 कोटी रुपयांचा, तर एसपीटीएक्ससाठी 70 कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे.
3 / 7
अहवालात म्हटले की, सध्या या करारावर भारतीय स्पर्धा आयोग (CCI) आणि दोन्ही कंपन्यांच्या संबंधित कर्जदारांची मंजुरी घेणे बाकी आहे. रिलायन्सचा हा मोठा करार कापड उद्योगात वाढ करण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. रिलायन्स आपला व्यवसाय सतत वाढवत आहे आणि एकामागून एक कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडत आहे.
4 / 7
शुभलक्ष्मी पॉलिटेक्स लि. डायरेक्ट पॉलिमरायझेशनद्वारे पॉलिस्टर फायबर, यार्न आणि टेक्सटाईल-ग्रेड चिप्स तयार करते. त्याची पॉलिमरायझेशन क्षमता 2,52,000 टन प्रतिवर्ष आहे. विशेष म्हणजे, फर्मचे दोन उत्पादन युनिट्स आहेत, त्यापैकी एक गुजरात, दहेज येथे आहे, तर दुसरे सिल्व्हासा, दादरा-नगर हवेली येथे आहे.
5 / 7
उलाढालीबद्दल बोलायचे झाल्यास, SPL ने 2019 मध्ये 2,702.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला, 2020 मध्ये 2,249.08 कोटी रुपये आणि 2021 मध्ये 1,768.39 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तर, SPTex ने 2019 मध्ये 337.02 कोटी रुपये, 2020 मध्ये 338.00 कोटी रुपये आणि 2021 मध्ये 267.40 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
6 / 7
अलीकडे, रिलायन्सने 70-80च्या दशताक लोकप्रिय असलेला कॅम्पा कोला ब्रँड विकत घेतला आहे. या ब्रँडद्वारे रिलायन्स कोला मार्केटमध्ये प्रवेश करत आहे. रिलायन्सने दिल्लीस्थित प्युअर ड्रिंक ग्रुपसोबत सुमारे 22 कोटी रुपयांचा करार करून कॅम्पा कोला ब्रँड स्वतःच्या नावे केला आहे. रिपोर्टनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज दिवाळीपर्यंत कॅम्पा कोलाचे तीन फ्लेवर बाजारात आणू शकते.
7 / 7
याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीजने कॅलिफोर्नियास्थित सोलर पॉवर सॉफ्टवेअर निर्माता सेनशॉकमधील 79.4 टक्के स्टेक $32 दशलक्ष किंवा सुमारे 256 कोटी रुपयांना विकत घेण्याची घोषणा केली आहे. Senshawk ची स्थापना 2018 साली झाली. ही कॅलिफोर्निया-आधारित कंपनी सौर ऊर्जा निर्मितीशी संबंधित सॉफ्टवेअर-आधारित साधने विकसित करते.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीRelianceरिलायन्स