शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Reliance Jio : केवळ १ रूपया जास्त देऊन वाढणार २८ दिवसांची वैधता; मिळेल ५६ जीबी अतिरिक्त डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 1:52 PM

1 / 10
रिलायन्स जिओकडे ९८ रुपयांपासून ३४९९ रुपयांपर्यंतचे रिचार्ज प्लॅन आहेत. जिओचे काही रिचार्ज प्लॅन खूप खास आहेत. रिलायन्स जिओच्या २ रिचार्ज रिचार्ज प्लॅन्सची आपण तुलना करणार आहोत आणि तुम्हाला फक्त १ रुपया अतिरिक्त खर्च करून २८ दिवसांची अधिक वैधता कशी मिळवता येईल हे पाहणार आहोत.
2 / 10
तसंच, तुम्हाला ५६जीबी अधिक डेटा मिळेल. जिओचे हे प्लॅन ५९८ आणि ५९९ रुपयांचे आहेत. चला तर मग जाणून घेऊया जिओच्या या योजनांमध्ये कोणते फायदे उपलब्ध आहेत.
3 / 10
रिलायन्स जिओच्या ५९८ रुपयांच्या रिचार्ज प्लानसह ५६ दिवसांची वैधता देण्यात येते. जिओच्या या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच जिओच्या या प्लानमध्ये एकूण ११२ जीबी डेटा देण्यात येत आहे.
4 / 10
या प्लॅनसोबत कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंगचा लाभ मिळतो. याशिवाय दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. जिओच्या या प्लॅनचं खास वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे यात Disney+ Hotstar चं मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येतं. याशिवाय ग्राहकांना जिओ अॅप्सचंही सबस्क्रिप्शन मिळतं.
5 / 10
रिलायन्स जिओच्या ५९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता देण्यात येते. प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये एकूण १६८ जीबी हायस्पीड डेटा उपलब्ध आहे.
6 / 10
या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा लाभ उपलब्ध आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात येत आहे. तसेच, जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
7 / 10
५९८ रुपयांच्या प्लॅनपेक्षा फक्त १ रुपया जास्त खर्च करून, म्हणजेच ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये, ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता मिळते. ५९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ५६ दिवसांची वैधता उपलब्ध आहे.
8 / 10
५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांची अधिक वैधता देण्यात आली आहे. जर उपलब्ध डेटाबद्दल सांगायचं झालं तर ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १६८ जीबी डेटा दिला जातो. तर ५९८ रुपयांच्या प्लानमध्ये फक्त ११२ जीबी डेटा देण्यात येतो.
9 / 10
५९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ५६ जीबी डेटा अधिक मिळतो. तसंच एकूण १ रुपया जास्त देत २८ दिवसांची वैधता आणि ५६ जीबी अधिक डेटा मिळतो.
10 / 10
५९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन देण्यात येतं. तसंच ५९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना हे सबस्क्रिप्शन देण्यात येत नाही.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाInternetइंटरनेटMONEYपैसा