reliance jio 75 rupee plan offering 2 month validity and data know more offers
Reliance Jio चा जबरदस्त प्लॅन; केवळ ७५ रूपये खर्च करून मिळवा ६० दिवसांसाठी फ्री कॉलिंग, डेटा By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 5:43 PM1 / 10सध्या रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडियासारख्या (Vodafone-Idea) कंपन्या ग्राहकांना अनेक जबरदस्त प्लॅन ऑफर करत आहेत. सध्या रिलायन्स जिओकडे परवडणारे अनेक प्लॅन्स आहेत.2 / 10रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन हा ७५ रूपयांचा आहे. या अंतर्गत कंपनी ग्राहकांना तब्बल दोन महिन्यांची वैधता देत आहे. 3 / 10कंपनीचा ७५ रूपयांचा प्लॅन हा रिलायन्स जिओ फोनसाठी आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत कॉलिंगसह डेटाचाही फायदा मिळतो. पाहूया या प्लॅनमध्ये कोणते मिळतायत ऑफर्स.4 / 10७५ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळते. परंतु सध्या सुरू असलेल्या विशेष ऑफर अंतर्गत ग्राहकांना १ प्लॅनवर १ प्लॅन फ्री देण्यात येत आहे. 5 / 10याचाच अर्थ ग्राहकांनं ७५ रूपयांचा प्लॅन घेतला तर त्यांनी २८ ऐवजी ५६ दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनसोबत ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचाही फायदा देण्यात येतो.6 / 10या प्लॅनसोबत ग्राहकांना एकूण सहा जीबी डेटा मिळतो. तसंच या प्लॅनमध्ये ग्राहकांना ५० एसएमएस पाठवण्याची सुविधाही मिळते. यासोबत रिलायन्स जिओच्या अॅप्सचं मोफत सबस्क्रीप्शनही मिळतं. 7 / 10रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन हा ३९ रूपयांचा आहे. यामध्ये ग्राहकांना १४ दिवसांची वैधता मिळते. तसंच या प्लॅनसोबतही एका प्लॅनवर एक प्लॅन फ्री अशी ऑफर मिळत आहे.8 / 10ग्राहकांना ३९ रूपयांच्या प्लॅनसोबत २८ दिवसांची वैधता मिळते. तसंच कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंग आणि एकून २.८ जीबी डेटाही देण्यात येतो. यासोबत ग्राहकांना जिओ अॅप्सचं सबस्क्रीप्शनही मिळतं. 9 / 10यापूर्वी कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स जिओनं ग्राहकांच्या सोयीसाठी एकावर एक प्लॅन मोफत देण्याची घोषणा केली होती.10 / 10रिलायन्स जिओनंतर अन्य कंपन्यांनीही आपल्या ग्राहकांसाठी कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर गैरसोय होऊ नये म्हणून काही ऑफर्स देण्याचा निर्णय घेतला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications