reliance jio airtel vodafone idea and bsnl prepaid plan under 100 rupees know more details
१०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे रिचार्ज प्लॅन्स; फ्री कॉलिंगसह मिळतोय डेटाचाही फायदा By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 4:13 PM1 / 11तुम्हाला एकाच वेळी मोबाईल रिचार्जसाठी अधिक पैसे खर्च करायचे नसतील आणि स्वस्त प्लॅन्सचा विचार करायचा असेल तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलच्या १०० रुपयांच्या रिचार्ज प्लॅनबद्दल. 2 / 11आम्ही केवळ त्या रिचार्ज योजना घेतल्या आहेत ज्यांमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा आहे. १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये युझर्सना २१ जीबी पर्यंत डेटा मिळतो. या व्यतिरिक्त या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना बर्याच फायदे मिळतात. जाणून घेऊया या प्लॅन्समध्ये कोणकोणते फायदे मिळतात. 3 / 11रिलायन्स जिओच्या १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत ९८ रुपयांचा एक प्लॅन मिळतो. जिओच्या या प्लॅनची वैधता १४ दिवसांची आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये युझर्सना दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच एकूण २१ जीबी डेटा योजनेत देण्यात आला आहे. 4 / 11या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदादेखील उपलब्ध आहे. याशिवाय जिओ अॅप्सची विनामूल्य सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.5 / 11सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलकडे अनेक प्लॅन्स आहेत. बीएसएनएलमध्ये १८, २९ रुपये, ९९ रुपयांचे रिचार्ज प्लॅन्स आहेत. १८ रुपयांच्या प्लॅनची वैधता २ दिवसांची आहे. या योजनेत अमर्यादित व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग सुविधादेखील देण्यात आलं आहे. या प्लॅनसोबत ग्राहकांना रोज १ जीबी डेटा देण्यात येतो. याशिवाय ग्राहकांना १०० एसएमएसही उपलब्ध आहेत.6 / 11२९ रूपयांच्या प्लॅनची वैधता ५ दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगचं बेनिफिट मइळतं. तसंच यासोबत दररोज १ जीबी डेटाही देण्यात येतो. याशिवाय ३०० एसएमएस पाठवण्याची सुविधाही मिळते.7 / 11बीएसएनएलच्या ९९ रूपयांच्या स्पेशल टॅरिफ व्हाऊचर्समध्ये २२ दिवसांची वैधता मिळते. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगही मिळतं. शिवाय काही सर्कलमध्ये ४१ रूपयांचाही प्लॅन आहे. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंगचा फायदा मिळतो. 8 / 11एअरटेलच्या १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅन्समध्ये १९ रुपयांचा प्लॅन आहे. एअरटेलच्या या प्लॅनची वैधता २ दिवसांची आहे. 9 / 11या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचे फायदेदेखील उपलब्ध आहेत. तसंच या प्लॅनसोबत २०० एमबी डेटा देण्यात येतो. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये युझर्सना एसएमएस पाठविण्याची सुविधा मिळत नाही.10 / 11व्होडाफोन-आयडियाकडे १९ आणि ९९ रुपयांचे दोन प्लॅन्स आहेत. व्होडाफोन आयडियाच्या १९ रुपयांच्या प्लॅनची वैधता २ दिवस आहे. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग फायदे देखील उपलब्ध आहेत. 11 / 11या प्लॅनमध्ये युझर्सना २०० एमबी डेटा देण्यात येतो. ९९ रुपयांच्या व्होडाफोन-आयडिया प्लॅनची वैधता १८ दिवसांची आहे. तसंच या प्लॅनमध्ये १ जीबी डेटा देण्यात आला आहे. याशिवाय ग्राहकांना १०० एसएमएस पाठवण्याचीही सुविधा देण्यात येत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications