शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन्स हवेत?; पाहा Jio, Airtel, Vi चे अधिक फायदा देणारे रिचार्ज

By जयदीप दाभोळकर | Published: August 05, 2021 11:36 AM

1 / 11
सध्या रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया या कंपन्या सातत्यानं काही ना काही नवे प्लॅन्स आणण्याचे प्रयत्न करत आहेत. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करणं आणि ग्राहकांना आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी कंपन्या प्रयत्न करताना दिसतात.
2 / 11
जर तुम्हाला मोबाईल रिचार्जवर जास्त पैसे खर्च करायचे नसतील आणि तुम्ही स्वस्त प्लॅन शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
3 / 11
१०० रूपयांच्या आत येणाऱ्या आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देणाऱ्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या रिचार्ज प्लॅनची तुलना आम्ही केली आहे. चला तर मग जाणून घेऊया जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया पैकी कोणती कंपनी रिचार्ज प्लॅनमध्ये सर्वात जास्त फायदा देतेय.
4 / 11
रिलायन्स जिओचा (Reliance Jio) ९८ रुपयांचा येणारा प्लॅन हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. रिलायन्स जिओच्या ९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये १४ दिवसांची वैधता मिळते.
5 / 11
या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा देण्यात येतो. तसंच एकूण २१ जीबी डेटा युझर्सना मिळतो. रिलायन्स जिओच्या कोणत्याही प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. तसंच जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येत. या प्लॅनमध्ये एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळत नाही.
6 / 11
व्होडाफोन आयडियाच्या ९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये आता १८ दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये एकूण १ जीबी डेटा देण्यात येतो.
7 / 11
व्होडाफोन आयडियाच्या १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. तसंच या प्लॅनमध्येही एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळत नाही.
8 / 11
एअरटेलकडे १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचा १९ रूपयांचा प्लॅन अनलिमिटेड प्लॅन आहे. एअरटेलच्या १९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २ दिवसांची वैधता मिळते.
9 / 11
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये एकून २०० एमबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळत नाही.
10 / 11
रिलायन्स जिओच्या ९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. तसंच या प्लॅनमध्ये एकूण २१ जीबी डेटा मिळतो. तर व्होडाफोन आयडियाच्या ९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना १ जीबी डेटा मिळतो.
11 / 11
एअरटेलच्या १९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २०० जीबी डेटा मिळतो. परंतु हा प्लॅन इतर कंपन्यांच्या प्लॅनच्या दृष्टीनं थोडा मागे आहे. जिोच्या ९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये १४ दिवसांची तर व्होडाफोन आयडियाच्या ९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये १८ दिवसांची वैधता मिळते.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोनIdeaआयडिया